20.2 C
Ratnagiri
Saturday, November 15, 2025

रेशन दुकानदारांची दिवाळी ‘कडू’, पालकमंत्र्यांना निवेदन देणार

जिल्ह्यातील रेशन दुकानदारांचे जुलै महिन्यापासून थकलेले कमिशन...

४४ कोटींच्या डांबर खरेदीत अनियमितता – बाळ माने

रत्नागिरी पालिकेत २०१४ ते २३ या कालावधीत...

खेर्डी-टेरव मार्ग होणार खड्डेमुक्त, बांधकाम विभागाचे आश्वासन

पुढील पंधरा दिवसांत खेर्डी-टेरव रस्त्यावरील सर्व खड्डे...
HomeRatnagiriविद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेकडे गांभीर्याने पाहा, अंमलबजावणी न केल्यास कारवाई

विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेकडे गांभीर्याने पाहा, अंमलबजावणी न केल्यास कारवाई

विद्यार्थ्यांची सुरक्षा सर्वतोपरी असल्यामुळे या उपाययोजनांशी तडजोड करता येणार नाही.

जिल्ह्यातील सर्व शाळांमधील विद्यार्थी व विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेच्या अनुषंगाने विविध उपाययोजना राबवल्या जात आहेत. शाळास्तरावर काटेकोर अंमलबजावणीबाबत शिक्षण विभागामार्फत सूचना दिल्या आहेत. शिक्षणाधिकारी, गटशिक्षणाधिकारी, शिक्षणविस्तार अधिकारी, केंद्रप्रमुखांमार्फत दररोज शाळानिहाय आढावाही घेत आहेत. अंमलबजावणी न केल्यास कारवाई केली जाईल, अशी सूचना जिल्हा परिषद प्रशासनाने दिली आहे. शालेय विद्यार्थ्यांच्या शिक्षणाबरोबरच त्यांच्या सुरक्षेचा मुद्दा अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. अलीकडे शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या अनुषंगाने काही अनुचित घटना घडल्या आहेत.

या बाबींची शासनस्तरावर गंभीर दखल घेण्यात आली आहे. विद्यार्थ्यांच्या विशेषतः मुलींच्या सुरक्षिततेसाठी उपाययोजनांसंदर्भात शासनस्तरावरून वेळोवेळी आदेश निर्गमित केले आहेत. विद्यार्थ्यांची सुरक्षा सर्वतोपरी असल्यामुळे या उपाययोजनांशी तडजोड करता येणार नाही. शाळा व परिसरात विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे आवश्यक आहे. या तरतुदीचे पालन न करणाऱ्या शाळांच्या संदर्भात कारवाई करण्यात येणार आहे. शाळेतील नियमित कर्मचाऱ्यांबरोबरच बाह्याद्वारे अथवा कंत्राटी पद्धतीने ज्या नेमणुका केल्या जातात त्यानुसार सुरक्षारक्षक, सफाई कामगार, मदतनीस, स्कूल बसचालकांची काटेकोर तपासणी शाळा व्यवस्थापनामार्फत होणे आवश्यक आहे.

तसेच, पोलिस यंत्रणेमार्फत चारित्र्य पडताळणी करणे आवश्यक आहे. शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेबाबत ठोस उपाययोजनांचा भाग म्हणून सर्व माध्यमांच्या सर्व व्यवस्थापनांच्या शाळांमध्ये तक्रारपेटी बसवणे आवश्यक आहे. तक्रारपेटीचे पालन न केल्यास शाळेच्या व्यक्तीशः मुख्याध्यापकास जबाबदार धरण्यात येणार आहे. तसेच कसूर झाल्याचे आढळून आल्यास मुख्याध्यापकावर शिस्तभंगाची कारवाईही होणार आहे. शाळा, केंद्र, तालुका, शहर साधन केंद्रस्तरावर शासन परिपत्रकानुसार सखी सावित्री समिती गठित करण्यात आली आहे तसेच राज्यस्तरावर शिक्षण आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली विद्यार्थी सुरक्षा आढावा समिती स्थापन करण्यात आली आहे.

RELATED ARTICLES

Most Popular