27.9 C
Ratnagiri
Sunday, August 3, 2025

मुहूर्ताच्या दिवशी पावसाचा खोडा केवळ २० टक्के नौका समुद्रात

शुक्रवारपासून मासेमारीवरील बंदी उठल्यानंतर पहिल्याच दिवशी स्थानिक...

“आम तो आम और गुटली का भी दाम” असा हा प्रकल्प : अनिकेत सुर्वे

"आता वाटद दशक्रोशीतील युवकांनी निर्धार केला आहे,...

स्मार्ट वीजमीटरचा निर्णय रद्द करायला लावू – लियाकत शाह

स्मार्ट वीजमीटर बसवल्यानंतर वाढीव वीजबिले येत असल्याच्या...
HomeMaharashtraवाशीम मधून आलेल्या पर्यटकांचा ताम्हिणी घाटात अपघात

वाशीम मधून आलेल्या पर्यटकांचा ताम्हिणी घाटात अपघात

वाशिमहून तळ कोकणात असलेल्या देवकुंड याठिकाणी हे पर्यटक जात होते. यावेळी हा भीषण अपघात झाला.

कोकण व पश्चिम महाराष्ट्रातील राज्यातील महत्वाचे पुणे या मेट्रो सिटीला जोडणाऱ्या रायगड जिल्हयाच्या हद्दीजवळ असलेल्या ताम्हिणी घाटात शनिवारी सायंकाळी मोठा अपघात झाला आहे. तीनजण जागीच ठार झाले असून चार प्रवासी गंभीर जखमी झालेत. महाड जवळ मुंबई गोवा महामार्गावर असलेल्या माणगावपासून सुमारे ३५ किलोमीटर अंतरावर थेट कोकण-पुणे जोडणारा रस्त्यावरील ताम्हिणी घाटात स्विफ्ट डिझायर कारला भीषण अपघात झाला व ही कार सुमारे २०० फुट खाली दरीत गेली. या अपघातात कारचा चुराडा झाला आहे. सदरचा अपघात शनिवारी सायंकाळी ६ वा. च्या सुमारास झाला.

वाशीम, जिल्हा अकोला येथील आलेल्या स्विफ्ट कारमध्ये एकुण ६ प्रवासी होते. ते कोकणात पर्यटनासाठी आले होते. वाशीमला तळकोकणात असलेल्या देवकुंडला हे पर्यटक जात होते. यावेळी हा दुर्दैवी भीषण अपघातात झाला.

ऋषभ चव्हाण, सौरभ हिंगे, कृष्णा राठोड अशी या दुर्घटनेतील मृतांची नावे आहेत. यांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर रोशन गाडे, प्रवीण सरकटे आणि रोशन चव्हाण हे गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे. शनिवार २० ऑगस्ट २०२२ रोजी संध्याकाळी सहाच्या सुमारास झाला. वाशिमहून तळ कोकणात असलेल्या देवकुंड याठिकाणी हे पर्यटक जात होते. यावेळी हा भीषण अपघात झाला. त्यांची कार ताम्हिणी घाटात आली. एक वळणावर थांबले असता ही गाडी सुमारे दोनशे फूट खोल दरीत कोसळली.

या भीषण अपघाताची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील तसेच माणगाव पोलीस पथक तसेच साळुंखे रेस्क्यू टीम तातडीने घटनास्थळी दाखल झाली. रुग्णवाहिकेतून मृत आणि जखमींना माणगाव उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. यासंबंधी घटनास्थळी रात्री उशिरापर्यंत बचावकार्य सुरू होते.

RELATED ARTICLES

Most Popular