भारताने टोकियो ऑलिम्पिक्समध्ये दमदार कामगिरी केल्याने, अनेक स्तरातून बक्षिसांचा वर्षाव त्यांच्यावर केला जात आहे. विजेत्याला सगळेच गौरवतात, परंतु रतन टाटा यांनी एक वेगळीच घोषणा केली आहे, जी ऐकून नक्कीच ऑलिम्पिक्समध्ये सहभागी झालेल्या खेळाडूंना सुखद धक्का बसणार आहे. थोडक्यासाठी कांस्य पदक चुकलेल्या भारतीय ॲथलीट्सचा टाटा मोटर्सकडून नुकतेच गौरवण्यात आले आहे. या खेळाडूंसाठी टाटा मोटर्सने हॅचबॅक्सची सुवर्ण मानक असलेली टाटा अल्ट्रोज कार भेट म्हणून दिली आहे.
टोकियो ऑलिम्पिक्समध्ये भारताला सात पदकं मिळाली, काही खेळाडूंची कांस्य पदके थोडक्यासाठी हुकली. पण, या दमदार कामगिरीच्या माध्यमातून या खेळाडूंनी लाखो लोकांच्या मनावर नाव कोरले आहेच आणि करोडो आगामी खेळाडूंना प्रेरित देखील केले आहे. ऑलिम्पिक्समध्ये हॉकी, बॉक्सिंग, रेसलिंग, गोल्फ आणि डिस्कस थ्रो(थाळी फेक) मध्ये खेळलेल्या खेळाडूंना कौतुकाची थाप देण्यासाठी टाटा मोटर्सने अशा विभागांमधील २४० ऑलिम्पियन्सना सन्मानित केले.
जाणून घेऊया टाटा मोटर्सच्या हटके हॅचबॅक कारची काही वैशिष्ट्ये. प्रत्येक वर्षी ऑटो एक्स्पो आयोजित केला जातो. २०१८ साली झालेल्या ऑटो एक्स्पोमध्ये पहिल्यांदाच या कारच्या मॉडेलचे सादरीकरण करण्यात आले. टाटा मोटर्सने नवीकोरी हॅचबॅक कार अल्ट्रॉज बाजारात आणली आहे. या कारचा लूक फारच आकर्षक असून, पेट्रोल आणि डिझेल दोन्ही प्रकारांमध्ये ती उपलब्ध असणार आहे. तसेच या कारची किंमत ५ ते ८ लाख रुपयांच्या दरम्यान असून, या कारला ग्राहकांचा उस्फुर्त प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे ही कार यशाचे शिखर गाठत आहे.
टाटा मोटर्सच्या वतीने खेळाडूंच्या भविष्यासाठी शुभेच्छा देत, पुढील अनेक वर्षे अजून दमदार प्रदर्शन करून भारताचे नाव अजून चमकावे अशी कामगिरी करून दाखवावी अशी इच्छा पसेंजर व्हेईकल बिझिनेसचे अध्यक्ष शैलेश चंद्रा यांनी व्यक्त केली.