25.2 C
Ratnagiri
Saturday, January 25, 2025

जिल्ह्यात घुसलेल्या बांगलादेशींचा शोध घेऊन वितरण मदत करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी

रत्नागिरी जिल्ह्यात गेल्या काही वर्षांपासून बांगलादेशी घुसखोर...

मालगुंड होणार आता पुस्तकांचे गाव मराठी भाषामंत्री उदय सामंत

रत्नागिरी तालुक्यातील पातील मालगुंड गावाला पुस्तकांचे गाव...

वाशिष्ठीतील गाळ उपशासाठी यंत्रसामुग्री वाढवा आमदार निकम

वाशिष्ठो नदीतील गाळ उपसा कामासाठी पुरेसा निधी...
HomeChiplunघोणसरे ऐथे टेम्पो ट्रॅव्हल्स पलटी होऊन अपघात…

घोणसरे ऐथे टेम्पो ट्रॅव्हल्स पलटी होऊन अपघात…

चालकाला झोपेची डुलकी आली आणि त्याचा गाडीवरील ताबा सुटला.

डोंबिवलीमधुन पर्यटनासाठी गुहागरला येणाऱ्या चारचाकी प्रवासी वाहनाला घोणसरे सुतारवाडी येथे अपघात झाला. चालकाला झोपेची डुलकी आल्याने वाहनावरचा ताबा सुटला आणि वाहन रस्त्याच्या बाजुला असलेल्या झाडावर जावून आदळले. या अपघातात चालकासह सतरा जखमी झाले. याबाबत ग्रामस्थांकडून मिळालेल्या माहितीनुसार ठाणे, डोंबिवली आणि कल्याण येथील पोंक्षे परिवारातील १७ जण पर्यटनासाठी ६० डिसेंबरला सकाळी ८ वा. डोंबिवलीतून निघाले. त्यांनी १७ आसनी प्रवासी वाहन (एमएच ०४ एलवाय ३४५७) भाड्याने घेतले होते. ६ डिसेंबरला गुहागरला व्याडेश्वर दर्शन, समुद्राचा आनंद लुटून ही मंडळी संगमेश्वर तालुक्यातील पोंक्षे आंबव येथे जाणार होती. सायं. ३.३० च्या सुमारास ही गाडी विजयश्री हॉस्पिटल दरम्यानचा पुल ओलांडून घोणसरे घोणसरे सुतारवाडी बस थांब्यापर्यंत आली. तिथे छोटासा चढ आणि छोटे वाकण आहे. याच चढात चालकाला झोपेची डुलकी आली आणि त्याचा गाडीवरील ताबा सुटला.

अनियंत्रीत झालेले वाहन रस्त्याच्या डाव्या बाजुला खाली उतरले आणि एका झाडावर जावून आदळले. या धडकेनंतर वाहन जागीच उलटले. वाहनात समोर बसलेला चालक आणि प्रवासी फटलेल्या काचेतून बाहेर पडले. धडकं आणि नंतर पलटी झाल्याने गाडीतील प्रवासी एकमेकांवर जावून पडले होते. तातडीने घोणसरे सुतारवाडीतील ग्रामस्थ आणि रस्त्यावरील प्रवाशांनि अपघातग्रस्त वाहनातील प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी धाव घेतली. वाहनाचा मागील दरवाजा उघडून १५ प्रवाशांना बाहेर काढण्यात आले. तातडीने खासगी वाहनांनी सर्वांना चिपळूणातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. रुग्णालयातून मिळालेल्या माहिती नुसार १७ प्रवासी व १ चालक यांच्यापैकी १ महिला व १ पुरुष यांची प्रकृती अधिक गंभीर आहे. अन्य १५ प्रवाशांवर चिपळूण येथेच उपचार सुरु आहेत. दरम्यान या अपघाताची नोंद चिपळूण पोलिस स्टेशन येते नोंदवण्याचे काम सुर आहे.

RELATED ARTICLES

Most Popular