25.6 C
Ratnagiri
Saturday, December 7, 2024

रहाटाघर बसस्थानकातही आता मोकाट गुरे…

शहरातील मोकाट गुरांच्या प्रश्नाकडे सर्वच यंत्रणांनी डोळेझाक...

नव्या सरकारचा शपथविधी होताच रत्नागिरीत भाजपाचा जल्लोष

राज्याचे नवे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री...

राजापूर पोस्ट कार्यालयातील पीआरएस सुविधेवर लगेच वक्रदृष्टीः सेवा बंद होणार

जिल्हयातील रत्नागिरीसह लांजा, संगमेश्वर आणि राजापूर येथील...
HomeChiplunज्यांनी ठाकरेंना सत्तेवरून पायउतार केले त्यांना धडा शिकविणारचः आ. भास्करशेठ जाधव

ज्यांनी ठाकरेंना सत्तेवरून पायउतार केले त्यांना धडा शिकविणारचः आ. भास्करशेठ जाधव

आपल्या भाषणात गेल्या २० वर्षांतील गावातील राजकीय प्रवासाला उजाळा दिला.

‘जे आपल्या प्रयत्नाने निवडून आले ते स्वार्थासाठी निघून गेले… पण आजही त्यांना ज्यांनी निवडून दिले ते माझ्यासोबत आहेत असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सांगतात त्यामुळे आपण आता विश्वासघातक्यांना धडा शिकवला पाहिजे, महाविकास आघाडीचे सरकार आणलेच पाहिजे आणि त्यासाठी चिपळुणातून प्रशांत यादवना प्रचंड मतांनी विजयी करा’ असे आवाहन शिवसेना नेते आणि आमदार भास्करशेठ जाधव यांनी खेर्डी येथील सभेत दिले. ज्यांनी ठाकरेंना सरकारमधून पायउतार केले त्यांना धडा शिकवल्या शिवाय आता गप्प बसायचे नाही असे आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केले. लोकशाही विश्वासघातक्यांना धडा मार्गाने शिकवला पाहिजे. महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार आले पाहिजे. विकासाच्या गप्पा कशाला मारता? विकास तर होणारच आहे. विकास स्वाभिमानाने सन्मानजनक व्हायला हवा. सन्मान राखून यश मिळवण्याची हिम्मत असायला पाहिजे. आता यांना घरी पाठवायचं, असा इशाराही त्यांनी दिला.

खेर्डी येथील महाविकास आघाडीचे उमेदवार प्रशांत यादव यांच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष माजी आमदार रमेश कदम, महाविकास आघाडीचे उमेदवार प्रशांत यादव, शिवसेना उबाठा पक्षाचे उपजिल्हाप्रमुख प्रताप शिंदे, विधानसभा क्षेत्राध्यक्ष बाळा कदम, तालुकाप्रमुख विनोद झगडे, माजी तालुकाप्रमुख सुधीर शिंदे, माजी सभापती सौ. धनश्री शिंदे, माजी सदस्य राकेश शिंदे, चिपळूण नागरीच्या संचालिका सौ. स्मिता चव्हाण, काँग्रेसचे चिपळूण तालुकाध्यक्ष लियाकत शाह, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे तालुकाध्यक्ष मुराद अडरेकर, शहराध्यक्ष रतन पवार, समन्वयक शिरीष काटकर, वासुदेव मेस्त्री आदी उपस्थित होते.

निवडून देणारे आपल्यासोबत – यावेळी भास्कर जाधव पुढे म्हणाले की, शिवसेना फुटीत १३ खासदार, ४० आमदार निघून गेले. मात्र माझ्यासोबत निवडून देणारे आहेत, असे शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी सांगितले होते. त्याचाच अनुभव चिपळूण, रत्नागिरी, खेड मतदारसंघात आहे. यामुळे तुम्हाला आता ठरवायचं आहे, निर्णय घ्यायचाय. ज्यांना तुम्ही निवडून दिलेत ते निघून गेले. आता तुम्हाला हिम्मत, ताकद, कर्तृत्व सिद्ध करण्याची संधी आली आहे. तुम्ही निवडून गेलात आमच्यामुळे, तुम्हाल पाडण्याची हिम्मत, ताकद आमच्य मनगटात आहे. हे दाखविण्याची वेळ आली, ते तुम्ही करून दाखवतान प्रशांत यादव यांना विजयी करा, असे आवाहन भास्कर जाधव यांनी यावेळ केले.

संधीसाधूंना पायउतार करणार – शिवसेना स्थापनेपासून ठाकरे कुटुंबीयांनी आपल्यासारख्या शिवसैनिकांना आमदार, खासदार, मुख्यमंत्री, केंद्रीयमंत्री, लोकसभा अध्यक्ष यासारखी पदे दिली. मात्र, सन २०१९ मध्ये परिस्थिती निर्माण झाली. भाजपाच्या धोक्यामुळे महाविकास आघाडीची स्थापना झाली. त्यानंतर ठाकरे कुटुंबीयांनी पदे घेतली. तेव्हा त्यांच्या पाठीशी राहण्याची संधी होती. मात्र, ते संधी साधू निघाले गद्दारं निघाले. स्वतःच्याच पक्षप्रमुखाला ४० आमदारांनी कोणताही गुन्हा दाखल नसताना विश्वासघाताने राज गादीवरून पायउतार केले. यामुळे आपले एकच ध्येय आहे, ज्यांनी ठाकरेंना पदावरून खाली उतरवले. त्यांना धडा शिकवल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असा इशारा देताना लोकशाही मार्गाने विश्वासघातकींना धडा शिकवला पाहिजे. महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार आले पाहिजे असे आवाहन उपस्थित जनसमुदायाला केले. तसेच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आदित्यनाथ योगी यांनी केलेल्या विधानाचा देखील समाचार घेतला.

रमेशराव कदमांची तोफ – यावेळी माजी आमदार रमेश कदम यांची तोफही चांगलीच ‘धडाडली. खेडर्डीतले ‘ते’ पुढारी आपलं कॉन्ट्रॅक्टचं दुकान बंद होऊ नये म्हणून गेले आहेत, असा टोला त्यांनी हाणला. भास्करराव आणि मी एकत्र असतो तेव्हा समोरच्याची डाळ शिजत नाही, असा इशारा विरोधकांना दिला.

प्रशांत यादव यांची टोलेबाजी – महाविकास आघाडीचे उमेदवार प्रशांत यादव यांनी खेर्डीवासियांसमोर नतमस्तक होताना गावच्या सुपुत्राला भरघोस मतांनी निवडून देण्याची साद घातली. आपल्या भाषणात गेल्या २० वर्षांतील गावातील राजकीय प्रवासाला उजाळा दिला. विकास फक्त यांचा झाला. एरवी एकत्र न येणारे आता स्वार्थासाठी एकत्र आले आहेत, असा टोला त्यांनी लगावला. या सभेला खेर्डीवासियांची चांगलीच गर्दी होती. यावेळी महाविकास आघाडीचे नेते पदाधिकारी व कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते. या सभेत एकच जल्लोष पाहावयास मिळाला.

RELATED ARTICLES

Most Popular