25.6 C
Ratnagiri
Saturday, December 7, 2024

रहाटाघर बसस्थानकातही आता मोकाट गुरे…

शहरातील मोकाट गुरांच्या प्रश्नाकडे सर्वच यंत्रणांनी डोळेझाक...

नव्या सरकारचा शपथविधी होताच रत्नागिरीत भाजपाचा जल्लोष

राज्याचे नवे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री...

राजापूर पोस्ट कार्यालयातील पीआरएस सुविधेवर लगेच वक्रदृष्टीः सेवा बंद होणार

जिल्हयातील रत्नागिरीसह लांजा, संगमेश्वर आणि राजापूर येथील...
HomeRatnagiriयेऊन येऊन येणार कोण… सामंतांशिवाय आहेच कोण? घोषणांनी रत्नागिरी दणाणली

येऊन येऊन येणार कोण… सामंतांशिवाय आहेच कोण? घोषणांनी रत्नागिरी दणाणली

या रॅलीची तरुण वर्गामध्ये मोठी क्रेझ दिसून आली.

‘येऊन येऊन येणार कोण उदय सामंताशिवाय आहेच कोण, कोण आला रे कोण आला शिवसेनेचा वाघ आला…’ अशा घोषणांनी सोमवारी रत्नागिरी शहर दणाणून गेलेः महायुतीचे उमेदवार ना. उदय सामंत यांच्या प्रचारार्थ सोमवारी शहरातून काढण्यात आलेल्या रॅलीला मोठा प्रतिसाद मिळाला. या रॅलीच्या आयोजनामध्ये मित्रपक्ष भारतीय जनता पक्षाने पुढाकार घेतला होता. भाजपचे नेते, माजी नगरसेवक पदाधिकारी आणि कार्यकर्ते या रॅलीमध्ये मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या रॅलीने ना. उदय सामंत यांच्या प्रचाराची सांगता झाली. रत्नागिरी शहरातील गवळीवाडा येथून रॅलीला सुरुवात झाली. गवळीवाडा येथील श्रीदत्त मंदिरात ना. उदय सामंत यांनी दर्शन घेतले. यावेळी मोठ्या संख्येने परिसरातील नागरिक उपस्थित होते. या रॅलीची तरुण वर्गामध्ये मोठी क्रेझ दिसून आली. श्रीदत्ताचे दर्शन घेतल्यानंतर जवळच असलेल्या पीर सय्यद इसाबुद्दीन शहा काद्री दर्गा येथे जाऊन त्यांनी दर्शन घेतले चादर चढवली. यावेळी मुस्लीम बांधवांनी ना. सामंतांच्या विजयासाठी दुवाँ मागितली.

जोरदार स्वागत – यानंतर खऱ्या अर्थाने प्रचार रॅलीला सुरुवात झाली. यामध्ये हजारो नागरिक सहभागी झाले होते. यानंतर बैलबाग येथील श्री कालभैरवाचे त्यांनी दर्शन घेतले. या भागातील नागरिकांनी त्यांचे जोरदार स्वागत केले. तेथून पुढे मच्छीमार्केटच्या दिशेने जाताना, सामंत यांचे मेमन समाजाच्यावतीने जोरदार स्वागत करण्यात आले. यावेळी मेमन समाजाने त्यांना निवडणुकीसाठी शुभेच्छा दिल्या.

श्री राम मंदिरात सांगता – त्यानंतर भाजीमंडई येथील पाराजवळील हनुमान मंदिरात ना. सामंत यांनी दर्शन घेतले. यावेळी परिसरातील नागरिकांनी त्यांचे उत्साहात स्वागत केले. येथून पुढे झारणी रोडच्या दिशेने त्यांनी प्रस्थान केले. याठिकाणी असणाऱ्या जामा मशिद येथील ट्रस्टवतीने ना. सामंताचे स्वागत नागरिकांनी केले. ही रॅली गोखलेनाका येथे आली. त्याठिकाणी व्यापारी संघाच्यावतीने गणेश भिंगार्डे यांनी त्यांचे स्वागत केले. तेथून पुढे ही रॅली राममंदिर येथे आली. याठिकाणी प्रभू श्रीरामाचे दर्शन घेतले. संपल्यानंतर ना. सामंत याच ठिकाणी बाबा परुळेकर, अॅड. विलास पाटणे यांच्यासह शिवसेनेचे शहरप्रमुख बिपीन बंदरकर व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

RELATED ARTICLES

Most Popular