26.4 C
Ratnagiri
Saturday, July 5, 2025

विजयदुर्ग’ वर पूल बांधून दोन जिल्हे जोडा…

तालुक्यातील कुंभवडे व सिंधुदुर्गच्या देवगड तालुक्यातील पाळेकरवाडी...

दाभोळ बंदराचा विकास करा – आ. शेखर निकम

दाभोळ ते पेढे हा जलमार्ग क्र. २८...

मोकाट गुरांचा दिवसाचा खर्च १० हजार – पालिकेला भुर्दंड

शहरातील मोकाट गुरांना पकडण्याची मोहीम पालिकेने हाती...
HomeRatnagiriजिल्हात भाज्यांची आवक घटली, दर कडाडले

जिल्हात भाज्यांची आवक घटली, दर कडाडले

महिनाभरापूर्वी ज्या भाज्या ३० ते ४० रुपये किलो मिळत होत्या, त्या आता ७० ते ८० रुपयाच्या वर गेल्या आहेत.

जिल्ह्यात पश्चिम महाराष्ट्रातून येणाऱ्या भाज्यांची आवक ४० टक्क्यांनी घटली आहे. त्यामुळे भाज्यांचे दर कडाडले असून घेवडा, गवार, फरसबी, हिरवी मिरची, मटार आणि भेंडी आदी भाज्यांच्या किलोच्या भावाने बाजारात शंभरी ओलांडली आहे. ही परिस्थिती काही महिने अशीच राहणार असल्याने भाज्यांचे दर आणखी वधारण्याची शक्यता काही व्यापाऱ्यांनी व्यक्त केली. जिल्ह्यात प्रामुख्याने पश्चिम महाराष्ट्रातून भाजीपाला येतो. काही स्थानिक शेतकरी असले तरी त्यांचा भाजीपाला किरकोळ स्वरूपात येतो. जिल्ह्यात दरदिवशी पश्चिम महाराष्ट्रातून साधारण १० टनांहून अधिक भाजी येते.

कृषी उत्पन्न बाजार समितीकडून या भाज्यांचा लिलाव केला जातो. त्यानंतर व्यापाऱ्यांच्या माध्यमातून त्यांची विक्री होते. शनिवारचा आणि मंगळवारच्या आठवडा बाजारात चांगली आवक होते; परंतु मागणीच्या तुलनेत भाज्यांचे उत्पादन घटल्याने जिल्ह्यात येणाऱ्या भाज्यांची आवक मोठ्या प्रमाणात घटली आहे. महिनाभरापासून २०, ३० आता, तर ४० टक्के भाज्यांची आवक घटली आहे. त्यात अधिकचा श्रावण महिना असल्याने मागणी वाढली आहे. महिनाभरापूर्वी ज्या भाज्या ३० ते ४० रुपये किलो मिळत होत्या, त्या आता ७० ते ८० रुपयाच्या वर गेल्या आहेत.

घाऊक व्यापाऱ्यांपेक्षा बाजारात या भाज्यांचे दर आता गगनाला भिडले आहेत. घेवडा, गवार, फरसबी, हिरवी मिरची, मटार आणि भेंडी आदींचे दर १०० रुपये किलोच्यावर गेले आहेत. यामुळे जिल्ह्यातील सर्वसामान्य गृहिणींचे महिन्याचे बजेट कोलमडले आहे. रत्नागिरीच्या मुख्य भाजीमंडईमधून आढावा घेतला असता गेल्या महिनाभरात पडलेल्या मुसळधार पावसामुळे पाणी साचून राहिल्याने शेतीचे प्रचंड नुकसान झाले. पावसाचा फटका पश्चिम महाराष्ट्राला मोठ्या प्रमाणात बसला आहे. यामुळे रत्नागिरीला जाणाऱ्या भाज्यांची आवक घटली आहे. त्यामुळे अनेकांचा कल रानभाज्यांकडे वाढला आहे.

RELATED ARTICLES

Most Popular