शासकीय कामे होण्यासाठी लाच घेण्याचे प्रमाण वाढले आहे. काही शासकीय अधिकारी, कर्मचारी नागरिकांचे काम करून देण्यासाठी पैशाच्या किंवा एखाद्या वस्तूच्या स्वरूपात लाच घेतात. गेल्या १५ महिन्यांच्या कालावधीत रत्नागिरीत लाचखोरीची तीन प्रकरणे आढळली असून, यापैकी दोघांना अटक केली आहे. याप्रकरणी तपासणी प्रक्रिया अजूनही सुरू आहे. रत्नागिरी जिल्ह्यात लाचखोरीचे प्रमाण इतर जिल्ह्यांच्या तुलनेने कमी आहे. या वर्षभरात तीन लाचखोरीची प्रकरणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने उघडकीस आणली. लाख रुपये पगार असूनही अगदी पाचशे हजार रुपयांचीही लाच घेतली जात आहे; मात्र याबाबत लोकांमध्ये तक्रार करण्याचे धाडस दाखवणाऱ्यांची संख्या अजूनही कमीच आहे. शासकीय अधिकारी, कर्मचारी यांना हजारो लाखभर पगार असला तरीही काहींना तो पगार पुरत नसल्याने लाच खाण्याची सवय लागलेली आहे. सध्या बहुतांश शासकीय कामांसाठी लाच मागितली जाते.
कामाचे स्वरूप लहान असले तरी ते करण्यासाठी भरमसाट पैशांची मागणी होते. लाच घेणे हा सध्या शिष्टाचार झाला आहे. जिथे तिथे शासकीय कामासाठी नागरिकांना लाच द्यावी लागते. त्यामुळे लाचखोरीची कीड कधी संपणार, हा अनुत्तरीत प्रश्न निर्माण झाला आहे. गेल्या ११ महिन्यांत लाचलुचपत विभागाकडून तीन कारवाया व तीन लाचखोर जाळ्यात सापडले आहेत. महसूल, भूमिअभिलेख, सहकारी संस्था असे मिळून तीन संशयितांवर कारवाई केली. यातील गेल्या वर्षभरात जिल्हात लाचखोरीची तीन प्रकरणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने उघड केली आहेत. यापैकी दोन अटकेत असून, तपास सुरू आहे. दरम्यान, या सगळ्या प्रकारात द्वितीय वर्ग श्रेणीतील अधिकाऱ्यांना लाचेचा मोह अधिक असल्याचे कारवाईवरून दिसून येते. आतापर्यंत जिल्ह्यात झालेल्या कारवाईमध्ये क्लास टू आणि श्री अधिकाऱ्यांना लाचेचा मोह अधिक असल्याचे दिसून येत आहे.
पैशाची मागणी केल्यास तक्रार करा – कुठल्याही कामासाठी लोकसेवक पैशाची मागणी करत असतील तर त्या विषयी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या येथील कार्यालयाकडे निर्भीडपणे तक्रार करावी. आपले नाव गुप्त ठेवण्यात येईल, असे आवाहन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस उपनिरीक्षक अविनाश पाटील यांनी केले आहे.