जगामध्ये अनेक लोक अनेक आजारांनी त्रस्त असतात. काही मधुमेह, उच्च रक्तदाब, गुडघेदुखी, कंबरदुखी, मायग्रेन, तर काही थायरॉईडच्या समस्येमुळे हैराण झालेले दिसतात. थायरॉईड ही फुलपाखराच्या आकार स्वरुपाची ग्रंथी असते. हे गळ्याच्या इथे आणि कॉलरबोनच्या अगदी वर स्थित असते. थायरॉईडची समस्या महिला वर्गामध्ये जास्त प्रमाणात आढळून येते. हा अंतःस्रावी ग्रंथीचा प्रकार असून, ज्यामुळे हार्मोन्स निर्माण होतात.
थायरॉईडची लक्षणे पहायला गेली तर, चिडचिडेपणा, हात थरथरणे, जरा चालले तरी थकवा जाणवणे, खूप जास्त घाम येणे, केस पातळ होणे, तुटणे, सर्दी, भूक भरपूर लागणे अथवा अगदी कमी होणे, हृदयाचे ठोके वाढणे, अशक्तपणा वजन वाढणे किंवा खूप कमी होणे इत्यादी लक्षणे जाणवू लागतात.
थायरॉईडचे दोन प्रकारचे आहेत, हायपोथायरॉईडीझम आणि हायपरथायरॉईडीझम. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, जेव्हा एखादी व्यक्ती शरीरामध्ये कमी-अधिक प्रमाणामध्ये थायरॉक्सिन हार्मोन तयार करू लागते, तेव्हाच मनुष्याला थायरॉईड रोगाची सुरुवात होते. हायपोथायरॉईडीझम आणि हायपरथायरॉईडीझम या दोन स्थिती वेगवेगळ्या रोगांमुळे होतात, जे थायरॉईड ग्रंथीवर विघातक परिणाम करण्याचे काम करतात. परंतु, आहार तज्ञ सांगतात की योग्य वेळी पौष्टिक व संतुलित आहारासह, हलका व्यायाम, योग्य औषधांचे सेवन केले तर थायरॉईडची क्षमता कमी केली जाऊ शकते. आहारामध्ये आयोडीन, कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी असलेल्या गोष्टींचा जास्तीत जास्त आणि दररोज समावेश करणे गरजेचे आहे.
बहुतांश फळे आहेत ज्यामध्ये मुबलक प्रमाणामध्ये सी आणि बी व्हिटॅमिन असते, ज्यामुळे शरीराला आलेला थकवा दूर होण्यास मदत होते. त्याचबरोबर लठ्ठपणा, मधुमेह, कर्करोग, ट्यूमर, हृदयरोगाचा आणि बद्धकोष्ठता यांसारख्या आजारांवर सुद्धा हि फळे उपयुक्त ठरतात. यामध्ये सफरचंद, अननस, संत्रे, जांभूळ, लिंबू इत्यादी फळांचा समवेश होतो. मोसमानुसार सर्वच फळांचे सेवन करणे हे निरोगी आयुष्यासाठी उपयुक्त ठरते. त्यामूळे कोणत्याही आजारापासून दूर राहायचे असेल तर योग्य सकस आहार, आणि व्यायाम याचा अवलंब करणे आवश्यक आहे.