25.8 C
Ratnagiri
Saturday, August 30, 2025

शिंदेंच्या मंत्र्यांवर लक्ष ठेवण्यासाठी अधिकारी…

राज्यात महायुती असली तरीही भाजपकडून कुरघोडींचे राजकारण...

पेढांबेतील पूल दुरुस्तीच्या प्रतीक्षेत, अवजड वाहतूक बंद

दुरुस्तीअभावी धोकादायक झालेला पेढांबे येथील जुन्या पुलावरून...

जनआरोग्य योजनेतील कार्ड बनवा : एम. देवेंदर सिंह

एकत्रित आयुष्मान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजना, महात्मा...
HomeRatnagiriएसटीत क्युआर कोडद्वारे आता मिळणार तिकीट

एसटीत क्युआर कोडद्वारे आता मिळणार तिकीट

बदलत्या काळानुसार लाल परी अर्थात् एसटी महामंडळ प्रवाशांना आधुनिक सेवा देण्याचा प्रयत्न करत आहे.

दिवसेंदिवस सर्व आर्थिक व्यवहारांचे डिजिटलायलेझन होत असून, यामध्ये आता एसटीने देखील पर्दापण करण्याचा निर्णय घेतला आहे. ज्यांना ऑनलाईन तिकिटाचे पैसे द्यायचे आहेत. त्यांना क्युआर कोड स्कॅनची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. त्यासाठी या महिन्यात सर्वप्रथम एसटीची तिकीट मशिन बदलण्यात येणार आहेत. यामध्ये कोडस्कॅन अपडेट करून घेण्यात येणार असून, या महिना अखेरपर्यंत एकाचवेळी ही सेवा महाराष्ट्रात उपलब्ध होणार असल्याची माहिती एसटी महामंडळाकडून देण्यात आली आहे. बदलत्या काळानुसार लाल परी अर्थात् एसटी महामंडळ प्रवाशांना आधुनिक सेवा देण्याचा प्रयत्न करत आहे.

शिवशाहीनंतर इलेक्ट्रिक बसेस महाराष्ट्रात दाखल झाल्या आहेत. आता संपूर्ण जग हे ऑनलाईन आर्थिक व्यवहार करताना दिसत आहे. कॅशलेस पेमेंट अधिक महत्त्व प्राप्त होत अगदी दहा रुपयाची वस्तू घेतली तरी लोक स्कॅन करून पे करतात. ही बदलती गरज लक्षात घेऊन एसटीनेही नागरिकांना कॅशलेस तिकीट पेमेंट करण्याचा निर्णय घेतला आहे. क्युआर कोड स्कॅन करून तिकिटाचे पैसे देता येणार आहे. आधी ही सिस्टीम अपडेट करून घेण्यात येणार असून, त्यानंतर ही अंमलबजावणी सुरू होईल. रत्नागिरी विभागाचाही समावेश आहे. आतापर्यंत प्रवाशांना ई-तिकीट दिले जात होते. आता पेमेंटही ई-सेवा प्रणालीद्वारे होणार आहे. गणेशोत्सवाआधी या सेवेला आरंभ होण्याची शक्यता आहे.

RELATED ARTICLES

Most Popular