26.8 C
Ratnagiri
Sunday, August 3, 2025

कुंभार्ली घाटाचे सोनपात्र घाट असे नामांतर करण्याची सकल धनगर समाजाची मागणी

सोनबा धनगर बांधवाची आठवण सदैव टिकवून ठेवण्यासाठी...

‘अनारक्षित मेमू रेल्वे’ बाबत नाराजी कोकण विकास समिती

गणेशोत्सवासाठी मध्यरेल्वेने जाहीर केलेल्या दिवा चिपळूण आणि...

दाभिळ, उन्हवरे, पानवळेत बीएसएनएलचे ‘नो नेटवर्क’

दापोली तालुक्यातील गावतळे बाजारपेठेसह उन्हवरे, दाभिळ, पावनळ...
HomeMaharashtraपर्यटन मार्गदर्शक बनायची संधी उपलब्ध

पर्यटन मार्गदर्शक बनायची संधी उपलब्ध

कोणत्याही नवीन ठिकाणी फिरायला जायचे असेल तर आपण सर्व पूर्वनियोजन करून ठेवतो. जसे कि हॉटेल बुकिंग, तेथील प्रेक्षणीय स्थळे, तेथील वाहतुकीच्या सोयी, तेथील इतर व्यवस्था आणि त्या नवीन जागेबद्दल इत्यंभूत माहिती देण्यासाठी हॉटेलच्या वतीने अथवा आपण एखादा पर्सनल गाईड म्हणजेच मार्गदर्शक ठरवून घेतो. हे गाईड काही जन स्थानिक असतात, ज्यांना त्या ठिकाणाची इत्यंभूत माहिती असते. पण त्यासाठी एखादा आवश्यक व्यवसायाभिमुख कोर्स केला तर या फिल्डमध्ये काम करणे अजून सहज शक्य होणार आहे.

पर्यटन संचालनालयाने केंद्रीय पर्यटन मंत्रालयाने तयार केलेला मार्गदर्शक प्रशिक्षण कार्यक्रम स्वीकारला आहे. मूळ ऑनलाइन कोर्स http://www.iitf.gov.in या पोर्टलवर हिंदी आणि इंग्रजी भाषेमध्ये उपलब्ध आहे. यामध्ये विविध पर्यटन पैलूंचे सात मॉड्यूल दिलेले आहेत. एकूण कार्यक्रम नोंदणी शुल्क २ हजार रुपये आहे. एससी, एसटी प्रवर्गातील उमेदवार तसेच नंदुरबार, वाशिम, गडचिरोली व उस्मानाबाद या आकांक्षीत जिल्ह्यांचे अधिवासीत रहिवाशांना नोंदणी शुल्कातून सवलत देण्यात आली आहे. परीक्षा शुल्क ५०० रुपये इतके आहे.

महाराष्ट्र राज्य पर्यटन संचालनालयामार्फत घेण्यात येत असलेल्या टूर गाईडविषयक ऑनलाईन प्रशिक्षणामध्ये आतापर्यंत राज्यातील ७०० हून अधिक युवक- युवतींनी सहभाग नोंदविला असून,  या प्रशिक्षणामध्ये अजुनही सहभाग नोंदविण्याची संधी उपलब्ध असून पात्र इच्छूकांनी यासाठी त्वरित अर्ज करावेत,  असे आवाहन पर्यटन संचालक डॉ. सावळकर यांनी केले आहे.  त्याचप्रमाणे संबंधित कोर्स साठी उमेदवार १२ वी उत्तीर्ण आणि १८ ते ४० वयोगटातील असावा. उमेदवार ४० वर्षांपेक्षा जास्त वयाचा असेल तर त्याने किमान दहावी उत्तीर्ण असावे, अशा काही अटी या प्रशिक्षणासाठी ठेवण्यात आल्या असल्याचे यांनी सांगितले. सर्व यशस्वी उमेदवारांना महाराष्ट्र पर्यटन प्रमाणित, परवानाधारक मार्गदर्शक म्हणून महाराष्ट्रातील कोणत्याही पर्यटनस्थळांवर फक्त पुरातत्व विभागाची सर्व  पर्यटनस्थळे वगळता मार्गदर्शक सेवा देण्याची परवानगी मिळू शकते.

RELATED ARTICLES

Most Popular