डेंजर झोनमध्ये डोंगर कटाईचे काम सुरू असल्याने मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील परशुराम घाटातील वाहतूक अतिशय धोकादायक बनली आहे. या काम दरम्यान, अधुनमधून रस्त्यावर दगड येत असल्याने वाहन धारकांच्या पोटात भीतीचा गोळा येत आहे. अजूनही बरेच काम शिल्लक असल्याने दिवसातील काही तास परशुराम घाट वाहतुकीस बंद ठेवण्याची मागणी होत आहे. तसा प्रस्ताव राष्ट्रीय महामार्ग विभाग पेण यांच्याकडून जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केला असला तरी त्यावर अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. परिणामी अतिशय धोका पत्करून या ठिकाणी वाहतूक सुरू आहे. मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाचे काम युध्द पातळीवर सुरू आहे. यामध्ये सध्या ५.४० किलोमीटरच्या परशुराम घाटातील बहुतांशी काँक्रिटीकरण पूर्ण झाले आहे: उर्वरीत १.२० किलो 8 मीटरच्या अंतरातील धोकादायक डोंगर उतार व दरडीमुळे हे काम अडचणीचे मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाचे काम युध्द पातळीवर सुरू आहे. यामध्ये सध्या ५.४० किलोमीटरच्या परशुराम घाटातील बहुतांशी काँक्रिटीकरण पूर्ण झाले आहे: उर्वरीत १.२० किलोमीटरच्या अंतरातील धोकादायक डोंगर उतार व दरडीमुळे हे काम अडचणीचे बनले आहे. त्यातच डोंगरच्या बाजूने २२ मीटर उंचीची भिंत असल्याने व त्यात मुरूमाची माती व भले मोठे दगड असल्याने वाहतूक सुरू ठेवून खोदकाम करण्यास अडचणी येत आहेत.

त्यासाठी खेड हद्दीतील ठेकेदार कल्याण टोलवेजने परशुराम घाटातील वाहतूक दि. २७ मार्च ते ३ एप्रिल २०२३ या कालावधीत दुपारी १२ ते सायंकाळी ६ या वेळेत बंद ठेवण्याची मागणी केली होती. तसा अहवाल राष्ट्रीय महामार्ग विभाग पेणकडून रत्नागिरीचे जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठविण्यात आला होता. तत्कालीन अप्पर जिल्हाधिकारी श्रीकांत गायकवाड यांनी जिल्हा पोलीस अधिक्षक, प्रांताधिकारी चिपळूण तसेच उपप्रादेशिक परिवहन अधिकारी रत्नागिरी यांना अभिप्राय देण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यानुसार त्यांना तो अहवाल देण्यात आला आहे. मात्र त्यावर अद्याप निर्णय न झाल्याने घाट बंदचा निर्णय लांबणीवर पडला आहे. पुढील महिन्यानंतर पावसाळा सुरू होत आहे. यामुळे या घाटातील काम जास्तीत जास्त मार्गी लागले नाही तर पावसाळ्यात गंभीर परिणामांना सामोरे जावे लागणार आहे.

चिपळूण हद्दीतील बहुतांशी काम पूर्ण होत आले आहे. खेड हद्दीतील कल्याण टोलवेज कंपनीचे काम अजूनही डेंजर झोनमध्ये शिल्लक आहे. त्यासाठी दिवसातील काही तास परशुराम घाट वाहतुकीस बंद ठेवण्याची मागणी राष्ट्रीय महामार्ग विभागाने जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. यावर येत्या काही दिवसात निर्णय होऊन किमान १० दिवस सलग परशुराम घाट वाहतुकीस बंद ठेवल्यास उर्वरीत चौपदरीकरणातील कामाला वेग देण्यासाठी ठेकेदार कंपनी आग्रही असल्याचे दिसून येत आहे.’ चिपळूण शहरात मोठ्या प्रमाणात यंत्रणा कामाला लावून कामाची गती वाढवण्यासाठी घाटातील वाहतूक बंद ठेवण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी १५ में पूर्वी किमान दहा दिवस घाट बंद राहिल्यास धोकादायक ठिकाणी काम करणे सोयीचे ठरणार आहे. त्यामुळे राष्ट्रीय महामार्ग विभागाने नवा प्रस्ताव सादर केला असून त्यामध्ये २७ एप्रिल ते ३ मेपर्यंत मुदत वाढविण्यात आल्यास या कालखंडात कामाला आणखी वेग येईल, असे नमूद केल्याचे सांगण्यात येत आहे.