खेड शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या नगरपालिका प्रशासनाकडून नागरिकांना गेल्या काही महिन्यांपासून दुषित पाणी पुरवठा करण्यात येत असल्याची १ धक्कादायक माहिती पुढे आली आहे. नगरपालिका प्रशासन नागरिकाच्या आरोग्याशी खेळत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. तर या गंभीर बाबीची दखल जिल्हाधिकारी यांनी घेऊन या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी करण्यात येत आहे. खेड नगरपालिकेकडून शहरातील नागरिकांना अकरा पाण्याच्या टाक्यां मधून पाणी पुरवठा करण्यात येत आहे. यातील पाच लाख लिटर च्या तीन टाक्या, एक लाख अडुसष्ट हजाराची एक, तीन लाख चाळीस हजार – लिटरची एक, एक लाख सत्तर हजार लिटरच्या दोन, एक लाख पन्नास हजार लिटर एक, एकज लाख ऐंशी हजार लिटर दोन तर एक लाख लिटरची एक अशा अकरा टाक्यांमधून शहराला पाणी पुरवठा करण्यात येतो. मात्र झपाट्याने वाढत असलेली लोकसंख्या गर्मीमुळे पाण्याचे कनेक्शन वाढत असल्याने शहराला सध्या कमी दाबाने पाणी पुरवठा करण्यात येत आहे. पाणी पुरवठा करण्यासाठी असणारे पंप हि कमी शक्तीचे असल्याने पाण्याच्या टाक्या भरण्यासाठी वेळ लागत असल्याचे चित्र आहे.

खेड शहराला नातुनागर धरणातून सोडण्यात येणाऱ्या पाण्याचा आधार असून भरणे येथील ज्याक्वेल मधून हे पाणी खेड शहराच्या या पाण्याच्या टाक्यांमध्ये आणले जाते. सध्या गरम पीचे दिवस आहेत. पाण्यात वेगवेगळे कीटक तैयार होत असतात यामुळे पाण्यामध्ये टीसीएल पावडर चा वापर कारावा लागतो. मात्र गेल्या सहा महिन्यांपासून टीसीएल पावडरची खरेदीच झाली नसल्याची गंभीरबाब समोर आली आहे. त्यामुळे धरणातून सोडण्यात आलेले पाणी जगबुडी नदी मार्गे जसे येते तसेच ते नागरिकांना सोडले जात आहे. तर खेड नगरपालिकेने लाखो रुपये खर्च करून पाण्याच्या टाकी जवळ पुणे येथील संस्थेकडून पाणी क्लोरीनेशन प्लांट घेतला आहे. मात्र त्याचे बिल अदा करण्यात न आल्याने क्लोरीनेष्ण प्लांट हि बंद आहे. त्यामुळे शहरातील नागरिकांना सद्य दुषित पाण्याचा पुरवठा होत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.