27 C
Ratnagiri
Saturday, July 27, 2024

कोकणातील मच्छीमार सहकार संस्था बंद होण्याच्या स्थितीतः आ. साळवी

रत्नागिरी जिल्हयातील मच्छीमारांच्या समस्या व मागण्यांबाबत मत्स्यव्यवसाय...

कोकण रेल्वेचे दुपदरीकरण होणार, वीर ते चिपळूण पहिला टप्पा करण्याचा निर्धार

कोकण रेल्वेचे दुपदरीकरण टप्प्याटप्यांनी करण्याचा निर्णय घेण्यात...

शेअर्स मार्केट मधून भरपूर पैसे कमावण्याचे आमिष दाखवुन फसवणूक

शेअर्स मार्केट मधून भरपूर पैसे मिळवून देण्याचे...
HomeKhedकशेडी बोगद्यातून दुतर्फा वाहतूक सुरू

कशेडी बोगद्यातून दुतर्फा वाहतूक सुरू

कशेडी घाट ४५ मिनिटा ऐवजी ८ मिनिटातच पार करणे शक्य झाले आहे.

मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडी, घाटाला पर्याय असलेल्या बहुचर्चित कशेडी बोगद्यातील दुतर्फा वाहतूक अखेर १ मे रोजी महाराष्ट्र दिनी सुरू झाली आहे. त्यामुळे अवघड वळणांचा कशेडी घाट ४५ मिनिटा ऐवजी ८ मिनिटातच पार करणे शक्य झाले आहे. बोगद्यातील दुतर्फा वाहतूक प्रारंभाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय महामार्ग खात्याकडून सुरक्षिततेच्या दृष्टीने अत्यावश्यक यंत्रसामुग्री तैनात करण्यात आली असून दिमतीला पोलिसांचा फौजफाटाही राहणार आहे. गणेशोत्सवानंतर शिमगोत्सवात २४ फेब्रुवारीपासून पुन्हा मुंबईहून गोव्याकडे जाणाऱ्या एकेरी वाहतुकीसाठी बोगदा खुला करण्यात आला होता.

त्यानंतर बोगद्यातील दुतर्फा मार्गाचे काम ठेकेदार कंपनीकडून युद्धपातळीवर हाती घेतले. पोलादपूर कातळी भोगावच्या हद्दीतील दोन्ही भुयारांच्या कामाला गती देत अंतर्गत कामे पूर्ण करण्याच्या दृष्टीने दिवस-रात्र यंत्रणां राबत होत्या. त्याचमुळेच १ मेपासून कशेडी बोगदा दुतर्फा वाहतुकीसाठी खुला झाला आहे. उन्हाळी सुट्टी हंगामासह लग्नसराई व जत्रोत्सवामुळे हजारोंच्या संख्येने चाकरमानी कोकणात दाखल होत आहेत. अशातच कशेडी बोगंदा बुधवारपासून दुतर्फा वाहतुकीसाठी खुला झाल्याने चाकरमानी सुखावले आहेत.

कशेडी बोगदा दुतर्फा वाहतुकीसाठी खुला करण्यापूर्वी राष्ट्रीय महामार्ग खात्याच्या अधिकाऱ्यांनी गेल्या दोन दिवसांपासून वाहनांद्वारे बोगद्यातून प्रवास करत चाचणी घेतली. अखंडित वीजपुरवठ्यासह वायूविजनच्या सुविधेसह अन्य सुविधांचीही पुरेपूर उपलब्धतता करून देण्यात आली आहे. प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने ठेकेदार कंपनीकडून जागोजागी कर्मचारी तैनात करण्यात येणार असून अत्याधुनिक सुरक्षिततेच्या दृष्टीने यंत्रसामुग्री तैनात ठेवण्यात आली आहे. याशिवाय वेगासह वाहतुकीवर लक्ष ठेवण्यासाठी वाहतूक पोलीसही तैनात करण्यात येणार आहेत.

RELATED ARTICLES

Most Popular