28.9 C
Ratnagiri
Tuesday, June 17, 2025

जिल्ह्यात पाच महिन्यांत १२ बेवारस मृतदेह

नदी, समुद्रकिनारी, खाजणात, जंगलात किवा अगदी निर्जनस्थळी...

अंतिम प्रभाग रचना एक सप्टेंबरला होणार जाहीर

स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचे बिगुल वाजले आहेत....

खेडच्या नाट्यगृहाचा पडदा दोन दशकांनी उघडणार

शहरातील स्व. मीनाताई ठाकरे सांस्कृतिक केंद्र तब्बल...
HomeChiplunदिवाणखवटीजवळ रेल्वेगाड्या धीम्या गतीने, ताशी २० किमी वेग

दिवाणखवटीजवळ रेल्वेगाड्या धीम्या गतीने, ताशी २० किमी वेग

दुर्घटनास्थळावर रेल्वे कर्मचाऱ्यांनीही करडी नजर ठेवली आहे.

कोकण रेल्वे मार्गावर दिवाणखवटी बोगद्याजवळ कोसळलेल्या मातीच्या भरावासह दरडीमुळे मार्ग वाहतुकीसाठी मोकळा रेल्वेगाड्यांच्या वेगावर निबंध घालण्यात आले आहेत. या परिसरात सलग तीन दिवस ताशी २० किलोमीटर वेगाने गाड्या धावत आहेत. गेल्या काही दिवसांपासून राज्यासह कोकणात मुसळधार पाऊस कोसळत आहेत. त्यामुळे दरड कोसळण्याच्या संख्येतही वाढ होऊ लागली आहे. दरम्यान, दिवाणखवटी बोगद्याजवळून मार्गस्थ होणाऱ्या सर्वच रेल्वेगाड्या ताशी १० कि.मी. वेग होता. आता हा वेग वाढवण्यात आला आहे. दुर्घटनास्थळावर रेल्वे कर्मचाऱ्यांनीही करडी नजर ठेवली आहे.

कोकण रेल्वेच्या २९ वर्षांच्या इतिहासात दिवाणखवटी बोगद्याजवळ पहिल्यांदाच मातीच्या भरावासह दरड कोसळून कोकण मार्ग ठप्प झाला होता. पावसाच्या थैमानामुळे एकामागोमाग एक मातीच्या भरावासह दरडी कोसळत राहिल्याने मार्ग वाहतुकीसाठी मोकळा करण्यासाठी सुमारे २६ तासांचा अवधी लागला होता. दिवाणखवटी बोगद्याजवळ घडलेल्या दुर्घटनेने कोकण मार्गावरील वाहतुकीला पूर्णतः ब्रेक लागल्यामुळे प्रवाशांचे अतोनात हाल झाले. दिवाणखवटी बोगद्याजवळ पुन्हा दुर्घटनेची पुनरावृत्ती होऊ नये, याकरिता कोकण रेल्वेच्या अभियांत्रिकी व यांत्रिकी विभागाने सखोल अभ्यास करण्यास सुरुवात केली आहे.

त्यावर कायम उपाय योजना करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. कोकण रेल्वे मार्गावरून धावणाऱ्या रेल्वेगाड्यांच्या वेगावर पावसाळी वेळापत्रकानुसार मर्यादा घालण्यात आल्या आहेत. दिवाणखवटी बोगद्याजवळून मार्गस्थ होणाऱ्या सर्वच रेल्वेगाड्यांच्या लोकोपायलटना ताशी २० कि.मी. वेगाने गाड्या चालवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यामुळे वेग कमी झाला आहे. सध्या मुसळधार पावसामुळे वेगावर नियंत्रण आले आहे. त्यामुळे निश्चितस्थळी पोहचण्यास विलंब होत असल्याने त्याचा फटका प्रवाशांना बसू लागला आहे.

RELATED ARTICLES

Most Popular