27.6 C
Ratnagiri
Saturday, August 2, 2025

मुहूर्ताच्या दिवशी पावसाचा खोडा केवळ २० टक्के नौका समुद्रात

शुक्रवारपासून मासेमारीवरील बंदी उठल्यानंतर पहिल्याच दिवशी स्थानिक...

“आम तो आम और गुटली का भी दाम” असा हा प्रकल्प : अनिकेत सुर्वे

"आता वाटद दशक्रोशीतील युवकांनी निर्धार केला आहे,...

स्मार्ट वीजमीटरचा निर्णय रद्द करायला लावू – लियाकत शाह

स्मार्ट वीजमीटर बसवल्यानंतर वाढीव वीजबिले येत असल्याच्या...
HomeRatnagiriअवकाळी पावसाचा वाहतूक आणि शेतीला फटका

अवकाळी पावसाचा वाहतूक आणि शेतीला फटका

रत्नागिरी जिल्ह्यामध्ये दिवाळीच्या पहिल्या दिवशी काही भागामध्ये धुवाधार पाऊस पडल्याचे दिसून आले आहे. गुरुवारी ४ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ४.३० च्या दरम्यान रत्नागिरी तालुक्यातील शहरी भागातील काही ठिकाणी तर जिल्ह्यामध्ये लांजा, चिपळूण,खेड, या तालुक्यांना सोसाट्याचा वारा आणि विजांच्या कडकडाटासह पावसाने झोडपून काढले.

ऐन दिवाळीत लक्ष्मीपूजनाच्या दिवशी आलेल्या या पावसामुळे नागरिकांची एकच भंबेरी उडाली, तर व्यापारी वर्गाचे लक्ष्मीपूजन हे मोठ्या उत्साहात आणि धामधुमीत केले जात असल्याने, अचानक आलेल्या पावसामुळे त्यांचा पुरता हिरमोड झाला.

हवामान खात्याने महाराष्ट्रामध्ये मागील आठवड्यामध्ये दोन ते तीन दिवस लक्षद्वीप व लगतच्या भागात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे अनेक भागात वादळी पाऊस पडण्याची शक्यता वर्तविली होती. त्यानुसार दिवाळी आणि लक्ष्मीपूजनाच्या शुभ मुहूर्तावर गुरुवारी ४ नोव्हेंबर रोजी सायंकाळी  ४.३० नंतर पावसाने वादळी वारा आणि विजांच्या कडकडाटासह शहरी व ग्रामीण भागात दमदार हजेरी लावली. साधारण पंचेचाळीस मिनिटे हा पाऊस अशा प्रकारे बरसत होता.

अशा अचानक उद्भवलेल्या अवकाळी पावसामुळे, तयार झालेल्या भातपिकांचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान उद्भवले असून, भातशेती कापुन पूर्ण करून त्या पिकाच्या एकत्रित उडव्या देखील करण्यात आल्या आहेत. तर काही ठिकाणी भाताची मळणी झोडणी पूर्ण झाली असून धान्यचा साठा करण्यात आला आहे. तर काही ठिकाणी भात पिकाची कापणी अंतिम टप्प्यात आली असतानाच अचानक पडलेल्या अवकाळी पावसामुळे हे भात पीक अडचणीत आले आहे.

अर्धा पाउण तास पडलेल्या दमदार पावसामुळे जास्त करून वाह्तुक आणि भात शेतीवर त्याचा मोठा परिणाम झाला असून, जनजीवन सुद्धा मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाले आहे.

RELATED ARTICLES

Most Popular