26.5 C
Ratnagiri
Saturday, July 5, 2025

विजयदुर्ग’ वर पूल बांधून दोन जिल्हे जोडा…

तालुक्यातील कुंभवडे व सिंधुदुर्गच्या देवगड तालुक्यातील पाळेकरवाडी...

दाभोळ बंदराचा विकास करा – आ. शेखर निकम

दाभोळ ते पेढे हा जलमार्ग क्र. २८...

मोकाट गुरांचा दिवसाचा खर्च १० हजार – पालिकेला भुर्दंड

शहरातील मोकाट गुरांना पकडण्याची मोहीम पालिकेने हाती...
HomeRatnagiriरेल्वेतून सुरू होती गांजाची वाहतूक को. रेल्वे पोलीसांनी दोघांना केली अटक

रेल्वेतून सुरू होती गांजाची वाहतूक को. रेल्वे पोलीसांनी दोघांना केली अटक

८.४९३ किलो गांजा जप्त करण्यात आला असून दोघांनाही अटक करण्यात आली आहे.

गोव्यातून केरळ येथे गांजा तस्करी केली जात होती. कोकण रेल्वे पोलिसांकडून दोघा संशयितांना ताब्यात घेत चौकशीअंती ही बाब उघड झाली. संशयितांकडून ८ लाख ४० हजार ९३० रुपयांचा ८.४९३ किलो गांजा जप्त करण्यात आला असून दोघांनाही अटक करण्यात आली आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, मडगाव रेल्वेस्थानकावर गस्त घातली जात असतानाच फलाट क्रमांक १ वरील दोघा जणांच्या हालचाली संशयास्पद आढळल्याने कोकण रेल्वे पोलिसांकडून त्यांची चौकशी करण्यात आली. त्यांना योग्य उत्तरे देता न आल्याने त्यांना पोलिस ठाण्यातं नेत चौकशी केली असता रेल्वेतून केरळला, गांजा तस्करी केली जात असल्याचे सांगितले.

संशयितांच्या पिशव्यांतून ८.४९३ किलो गांजा जप्त करण्यात आला. ज्याची किंमत ८.४ लाख एवढी आहे. गांजा बाळगल्याप्रकरणी व तस्करी करत असल्याप्रकरणी कोकण रेल्वे पोलिसांकडून संजय प्रामाणिक (२४, रा. पश्चिम बंगाल) व सुदेश दोहरे (२४, रा. उत्तरप्रदेश) या दोघांना ताब्यात घेत रितसर अटक करण्यात आली. ही कारवाई पोलीस अधीक्षक गुरुदास गावडे, उपअधीक्षक गुरुदास कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुनील गुडलर, योगेश पुजारी, स्वीझेल फर्नांडिस, हेड कॉन्स्टेबल राजेश नाईक व होमगार्ड गोकुळदास गावकर यांनी केली.

RELATED ARTICLES

Most Popular