20.3 C
Ratnagiri
Sunday, January 25, 2026

उपनगराध्यक्ष-अभियंता यांच्यात खडाजंगी रत्नागिरी नगरपालिका

रत्नागिरी नगरपालिकेच्या आवारात आज सायंकाळी उपनगराध्यक्ष समीर...

शहरातील अतिक्रमणांवर आज हातोडा रत्नागिरी पालिका आक्रमक

शहरातील अतिक्रमणाविरोधात पालिका आक्रमक झाली आहे. यातून...

दापोलीत ठाकरेंच्या उमेदवाराचा अर्ज अवैध

पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकीसाठी सुरू...
HomeRajapurराजापुरात झाड कोसळले, एकाचा मृत्यू

राजापुरात झाड कोसळले, एकाचा मृत्यू

वादळीवारेच नव्हे तर साधी वाऱ्याची झुळुकही नसताना भलाम मोठा गुलमोहराचे भले मोठे झाड अचानक उन्मळून आठवडा बाजारातच आडवे झाल्याने एकच हाहाकार उडाला.

नियतीचा खेळ अजब असतो याचा प्रत्यय राजापूर शहरात गुरूवारी भरलेल्या आठवडा बाजारात आला. वादळीवारेच नव्हे तर साधी वाऱ्याची झुळुकही नसताना भलाम मोठा गुलमोहराचे भले मोठे झाड अचानक उन्मळून आठवडा बाजारातच आडवे झाल्याने एकच हाहाकार उडाला. कोसळलेल्या वृक्षाखाली थेट सापडून बाजारात खरेदीसाठी आलेल्या एका ४८ वर्षीय प्रौढाचा दुर्देवी मृत्यू झाला. रामचंद्र बाबाजी शेळके (वय ४८, रा. बारसू) असे मृत्यू पावलेल्या व्यक्तीचे नाव असल्याचे पोलिसांनी सांगितले. या दुर्घटनेत मच्छी विक्री करणाऱ्या ३ महिला जखमी झाल्या आहेत. राजापूर शहरातील गणेश घाट परिसरात दि. १३ रोजी दर गुरूवारचा आठवडा बाजार भरला होता.

गुरूवारी सकाळपासूनच राजापुरात अधूनमधून साधारण पाऊस कोसळत होता. मात्र वारे नव्हते. सायंकाळी ४.३० वाजण्याच्या सुमारास आठवडा बाजारातील शौचालयालगत असलेले. गुलमोहराचे महाप्रचंड झाड अचानक उन्मळून पडले. त्यादरम्याने या झाडाखाली लावलेल्या दुकानातच बारसू येथील रिक्षा व्यावसायिक रामचंद्र शेळके खरेदी करत होते. उन्मळून पडलेल्या झाडाच्या विस्तीर्ण बुंध्याखालीच शेळके सापडल्याने त्यांना गंभीर दुखापत झाली. मोठ्या मुष्किलीने बाहेर काढून त्यांना तत्काळ राजापूर ग्रामीण रूग्णालयात नेण्याद आले. मात्र त्या ठिकाणी वैद्यकीय अधिकाऱ्यांना त्यांना मृत घोषित केले. ३ महिला जखमी

झाडाच्या आजुबाजूलाच मच्छी – विक्रीसाठी बसलेल्या महिलांच्या अंगावर झाडाच्या फांद्या पडल्याने या दुर्घटनेत तीन महिला जखमी झाल्या. मुमताज आसिफ फणसोपकर (४८), यास्मिन शौकत कोतवडकर (३५), सायका इरफान पावसकर (५५) सर्व रा. मधीलवाडा, राजापूर) यां समावेश असून त्यांनाही लागलीच राजापूर ग्रामीण रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. या दुर्घटनेची माहिती मिळताच नगर परिषद प्रशासनाने तत्काळ घटनास्थळी जाऊन पडलेले झाड तोडून बाजूला करण्याचे काम हाती घेतले.

तहसीलदार शीतल जाधव, पोलिस निरीक्षक भरत धुमाळे, मुख्याधिकारी प्रशांत भोसले यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. तर माजी नगराध्यक्ष अॅड. जमीर खलिफे, माजी नगरसेवक सुलतान ठाकूर, शिवसेना शहर प्रमुख संजय पवार, रिक्षा सेनेचे पराग चिंबुलकर यांच्यासह शहरातील नागरिकांनी रूग्णालयात धाव घेत जखमींची विचारपूस केली. या दुर्देवी घटने हकनाक आपला जीव गमावणाऱ्या राम चंद्र शेळके यांच्या कुटुंबियांना शासना भरीव आर्थिक मदत देऊन सहाय्य करावे, अशी मागणी राजापूरकरांनी केली आहे.

RELATED ARTICLES

Most Popular