24.3 C
Ratnagiri
Tuesday, October 14, 2025

दहावी, बारावी बोर्ड परीक्षेसाठी राजमार्ग

कोकण व कोल्हापूर विभागीय मंडळाचे अध्यक्ष राजेश...

जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना नोटिसा…

आपापल्या जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्यकेंद्रांकडे दुर्लक्ष केल्याचा ठपका...

पूररेषेतील बांधकामांसाठी अटीत शिथिलता

शहरातील पूररेषेतील बांधकामांसाठी नगरविकास खात्याच्या नियमांमध्ये शिथिलता...
HomeRatnagiriकाळा बाजार रोखण्याचा प्रयत्न, रेशन ज्या त्या महिन्यातच देणार

काळा बाजार रोखण्याचा प्रयत्न, रेशन ज्या त्या महिन्यातच देणार

तसे झाले नाही तर त्यांचे रेशन परत जाईल आणि पुढील महिन्यात ते मिळणार नाही.

केंद्र शासनाने धान्य नेण्यासाठी पॉस मशिनवरील मुदतवाढ देण्यात येणार नाही, असे आदेश काढले आहेत. त्यामुळे ग्राहकांना त्या त्या महिन्यातील धान्य न घेतल्यास ते पुढे मिळणार नाही. परिणामी, रेशनकार्डधारकांना दर महिन्याला धान्याची उचल करावीच लागणार आहे. या सूचना जिल्हा पुरवठा विभागाला प्राप्त झाल्या आहेत. धान्यातील काळा बाजार रोखण्यासाठी केंद्र सरकारने हे पाऊल उचलले आहे. सार्वजनिक वितरण प्रणालीअंतर्गत लाभार्थीना दर महिन्याला मिळणारे रेशन वेळेवर उचलले गेले नाही तर पुढील महिन्यात ते रेशन उचलता येत होते.

त्यामुळे धान्य शिल्लक राहात होते. ते परत कसे द्यायचे आणि लाभार्थीना कसे वितरित करायचे, हा प्रश्न दुकानदारांपुढे निर्माण होत होता; मात्र आता नवीन निर्णयानुसार, त्या महिन्याचे रेशन त्याच महिन्यात उचलणे बंधनकारक करण्यात आले आहे. तसे झाले नाही तर त्यांचे रेशन परत जाईल आणि पुढील महिन्यात ते मिळणार नाही. त्यामुळे रेशन शिल्लक राहण्याचा प्रश्न निकाली निघणार आहे. आतापर्यंत त्या महिन्याचे धान्य पुढच्या महिन्याच्या ७ तारखेपर्यंत रेशन दुकानावरून घेता येत असे; परंतु आता त्या त्या महिन्याच्या ३० तारखेपर्यंतच धान्य घ्यावे लागणार आहे.

RELATED ARTICLES

Most Popular