20.3 C
Ratnagiri
Sunday, January 25, 2026

उपनगराध्यक्ष-अभियंता यांच्यात खडाजंगी रत्नागिरी नगरपालिका

रत्नागिरी नगरपालिकेच्या आवारात आज सायंकाळी उपनगराध्यक्ष समीर...

शहरातील अतिक्रमणांवर आज हातोडा रत्नागिरी पालिका आक्रमक

शहरातील अतिक्रमणाविरोधात पालिका आक्रमक झाली आहे. यातून...

दापोलीत ठाकरेंच्या उमेदवाराचा अर्ज अवैध

पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकीसाठी सुरू...
HomeMaharashtraजय मराठी! ५ जुलैला विजयोत्सव मरार विजयोत्यावर दोन ठाकरे बंधू येणार एकत्र

जय मराठी! ५ जुलैला विजयोत्सव मरार विजयोत्यावर दोन ठाकरे बंधू येणार एकत्र

हा मेळावा कोणत्याही पक्षाचा नसेल असं स्पष्ट शब्दांत सांगितले आहे.

पहिलीपासून हिंदी शिकविण्याचा निर्णय सरकारने मागे घेतल्यानंतर दोन ठाकरे बंधूंच्या प्रयत्नांनी ५ जुलैला निघणारा विराट मोर्चा जरी रद्द झाला असला तरी त्यादिवशी आता विजयोत्सवं साजरा करण्यात येणार आहे. या विजयोत्सवाच्या निमित्ताने राज आणि उध्दव हे दोन ठाकरें बंधू ५ जुलैला एकाच मंचावर येण्याची शक्यता आहे. तपशीलवार नियोजन व्हायचे बाकी असले तरी उध्दव ठाकरे आणि राज ठाकरे या दोन्ही नेत्यांनी ५ जुलैला विजयोत्सव साजरा करण्याचे जाहीर केले आहे. पहिलीपासून हिंदी शिकवण्याच्या, निर्णयाविरोधात विरोधी पक्षांनी आवाज उठवल्यावर राज्य सरकारने राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार त्रिभाषा सूत्र लागू करण्याचे दोन शासकीय आदेश रद्द करण्याची घोषणा केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळ बैठकीनंतर रविवारी हा निर्णय जाहीर केला. ठाकरे बंधूंच्या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर सरकारने हिंदीच्या मुद्यावरुन माघार घेतली. त्यानंतर आता मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेकडून आयोजित करण्यात आलेला ५ जुलैचा मोर्चा रद्द करण्यात आला असून त्याऐवजी विजयी मेळावा घेण्यात येणार आहे.

दोन्ही पक्षांनी त्यासंदर्भात सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. मात्र मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी हा मेळावा कोणत्याही पक्षाचा नसेल असं स्पष्ट शब्दांत सांगितले आहे. हिंदीसक्तीचा निर्णय रद्द झाल्याच्या पार्श्वभूमीवर सोमवारी राज ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत आपली भूमिका मांडली. ते म्हणाले की, या निर्णयानंतर रविवारी मला संजय राऊतांचा फोन आला होता. त्यांनी विचारलं यापुढे काय करायचं. मी म्हटलं मोर्चा रद्द करावा लागेल. ते म्हणाले की आपण एक विजयी मेळावा घ्यायला पाहिजे. मी घेऊया असं म्हटलं. माझ्या लोकांसोबत चर्चा केल्यानंतर आपण ठरवूया. ५ तारखेला काय करायचं अजून काही ठिकाण ठरलेलं नाही. मी माझ्या सहकाऱ्यांशी बोलेन. माझे सहकारी त्यांच्याशी बोलतील. त्यातून ५ तारखेचा मेळावा होईल. तो मेळावा जरी झाला तरी त्याला पक्षीय लेबलं लावण्यात काही अर्थ नाही.

हा विजय खरंतर मराठी माणसाचा आहे. त्या दृष्टिकोनातूनच या मेळाव्याकडे पाहिलं पाहिजे, अस राज ठाकरे म्हणाले. मराठी भाषेच्या विरोधात उद्या कोणी जरी असेल माझा त्याला विरोध असेल. महाराष्ट्रातील प्रत्येक राजकीय नेत्याला माझी विनंती हीच राहील की मराठी, महाराष्ट्र या विषयावर कुठल्याही प्रकारची तडजोड होता कामा नये. यापुढे सर्वांनी सतर्क राहणे आवश्यक आहे. सर्व बाजूंनी म हाराष्ट्राचे लचके तोडण्याचे प्रकार सुरू आहेत. हे थांबवणे आवश्यक आहे. मराठी माणसाने  देखील आजूबाजूला काय गोष्टी घडत आहेत यासाठी जागृत राहणे आवश्यक आहे, असही राज ठाकरे म्हणाले.

RELATED ARTICLES

Most Popular