23.9 C
Ratnagiri
Thursday, September 19, 2024

विराट कोहली एक हजारी क्लबमध्ये सामील होणार…

यजमान भारत आणि बांगलादेश यांच्यातील 2 सामन्यांच्या...

या दिवशी थिएटरमध्ये फक्त 99 रुपयांमध्ये चित्रपट पहा…

चित्रपट प्रेमींसाठी एक आनंदाची बातमी आहे. 20...

चाकरमान्यांची कोकण रेल्वे, मुंबई-गोवा महामार्गावर गैरसोय

कोकणात सणाच्या निमित्ताने येणाऱ्या जाणाऱ्या चाकरमानी लोकांची...
HomeRatnagiriमुख्यमंत्र्यांना लक्ष करून त्यांच्यावर टीका करण्यासाठी यात्रा असेल, तर मात्र रिॲक्‍शन हि...

मुख्यमंत्र्यांना लक्ष करून त्यांच्यावर टीका करण्यासाठी यात्रा असेल, तर मात्र रिॲक्‍शन हि होणारच- नाम. सामंत

रत्नागिरीमध्ये नारायण राणे यांच्या जनआशीर्वाद यात्रेला पुन्हा सुरू झाल्यानंतर पत्रकार परिषदेमध्ये राणेंनी पुन्हा एकदा सेना आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर अनेक आरोप केले आहेत. त्याचप्रमाणे नाम. उदय सामंत यांच्याबाबत देखील भाजपने वैयक्तिक आक्षेपार्ह टिपण्णी केली होती. त्यावर सामंत यांनी जाहीर खुलासा करून, भाजपच्या आरोपांमध्ये काहीही तथ्य नसून, जर तसे सिद्ध झाले तर राजकीय संन्यास घेईन असे ठासून सांगितले होते.

पुढे त्यांनी सांगितले कि, मोदी सरकारने केलेल्या कामाची कामगिरी सांगण्यासाठी ही जन आशीर्वाद यात्रा असेल,  तर आमचं काहीच म्‍हणणं नाही.  पण विनाकारण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लक्ष करून जर त्यांच्यावर टीका करण्यासाठी यात्रेचा उपयोग केला जात असेल, तर त्‍यावर रिॲक्‍शन ही होणारच असा इशारा पालकमंत्री उदय सामंत यांनी आज दिला. आणि जिल्ह्यातील मनाई आदेशाचे उल्‍लंघन झाले तर प्रशासन योग्‍य ती कारवाई करेलच, असेही ते म्‍हणाले. त्यावेळी नाम. सामंत यांसोबत आम. वैभव नाईक, नगरसेवक सुशांत नाईक, संदेश पटेल, शिवसेना नेते संदेश पारकर,  अतुल रावराणे,  शैलेश भोगले आणि आदी शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते होते.

जनआशीर्वाद कुणी काढावी हा ज्याचा त्याचा वैयक्तिक मुद्दा आहे. त्यांना केंद्रीय स्तरावरून सांगितले असेल. आम्ही ज्या पक्षात काम करतो, त्या पक्षाशी प्रामाणिक राहणे कटिबद्ध मानतो. शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरेंना मानणारे नेते आहोत. उद्धव ठाकरे आमचे दैवत आहेत. त्यामुळे यात्रेदरम्यान कोणतीही वैयक्तिक टीका त्यांच्यावर होणार नाही, याची दक्षता त्यांनी हि घेतली पाहिजे. संयम ठेवला पाहिजे. तशी टीका झाली तर त्याचे कसे परिणाम होतात, हे चार दिवसांपूर्वी प्रत्येकाने अनुभवले आहेत. पुन्हा जरी टीका सुरू झाली असली तरी प्रत्येकाने संयमानेच वागलं पाहिजे. चांगल्या पद्धतीची ॲक्शन झाली तर रिॲक्शनही तशी असेल, असा सज्जड इशारा उदय सामंत यांनी दिला आहे.

RELATED ARTICLES

Most Popular