शनिवारपर्यंत शिवसेना बंडखोरांवर कारवाई करण्यासाठीच्या बैठकीत उपस्थित राहणारे राज्याचे उच्च शिक्षण मंत्री उदय सामंतही आता नॉट रिचेबल आहेत. आज सकाळपासून उदय सामंत नॉट रिचेबल आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा चर्चांना उधाण आले आहे. उदय सामंतदेखील एकनाथ शिंदे यांच्या गटात सहभागी होणार असल्याचे म्हटले जात आहे. आज सकाळीच उदय सामंत सूरतला गेले असल्याचे म्हटले जात आहे. विशेष म्हणजे उदय सामंत हे शनिवारी झालेल्य शिवसेनेच्या कार्यकारणी बैठकीत उपस्थित होते.
#BREAKING | Shiv Sena MLA Uday Samant enroute Guwahati, first visuals accessed.
Watch here-https://t.co/wDug1MMYG6 pic.twitter.com/WhdSCnPrl9
— Republic (@republic) June 26, 2022
बंड केलेल्या आमदारांवर कारवाई करण्यासाठी शिवसेनेकडून पावले उचलली जात आहेत. तर, दुसरीकडे शिवसेनेतून होणारी आमदारांची गळती थांबण्याची कोणतीही चिन्हं नाहीत. एकनाथ शिंदे गटाने शिवसेनेचे 40 आमदार आणि इतर अपक्षांसह जवळपास 50 आमदारांचा गट तयार केला आहे. एकनाथ शिंदे यांच्या गटातील आमदार सध्या गुवाहाटीमध्ये थांबले आहेत. आता या फुटीर आमदारांच्या यादीत उदय सामंत यांचेही नाव जोडले जाण्याची शक्यता आहे. उदय सामंत हे रत्नागिरीचे आमदार आहेत. कोकणातील दीपक केसरकर यांनीदेखील पक्षाविरोधात बंड पुकारले आहे. त्याशिवाय, रायगडमधीलही शिवसेनेच्या आमदारांनी एकनाथ शिंदे यांना साथ दिली आहे.
#BREAKING | In another jolt to #ShivSena, Uday Samant, #Maharashtra Minister of Higher & Technical Education on his way to Guwahati to join hands with #EknathShinde camp.#ShivSena #Guwahati #UdaySamant pic.twitter.com/yzxbkYQVLJ
— Afternoon Voice (@Afternoon_Voice) June 26, 2022
उदय सामंत यांनी सुरतमार्गे गुवाहाटीला जाण्याआधी आमदार राजन साळवी यांना फोन केला होता. माझ्याबरोबर आपणही चला. पण राजन साळवी यांनी नकार दिला असल्याची माहिती समोर आली आहे. काही महिन्यापासून एकनाथ शिंदे, रामदास कदम, भास्कर जाधव आणि राजन साळवी यांचा कोकणात एक गट तयार झाला होता, अशी चर्चा सुरू आहे. हा गट अनिल परब, सुनील तटकरे यांच्या कार्यप्रणालीवर नाराज होता. अनिल परब आणि सुनील तटकरे नेहमीच या नेत्यांच्या कामात हस्तक्षेप करायचे. त्यामुळे कोकणातील शिवसेना आमदारांमध्ये मोठी नाराजी निर्माण झाली होती, अशी चर्चा आहे.