आधारकार्ड हे महत्वाच्या कागदपत्रांपैकी एक मानले जाते. ५ वर्षांखालील लहान मुलांचे बोटांचे ठसे निश्चित मिळत नसल्याने त्यांचे आधारकार्ड बनण्यास विलंब होतो. पण आत्ता UIDAI चे सीईओ सौरभ गर्ग यांनी म्हटले आहे की, आम्ही नवजात बालकांना आधार क्रमांक देण्यासाठी बर्थ रजिस्ट्रार करार करण्याच्या प्रयत्नात आहोत. गर्ग यांनी पुढे माहिती देताना सांगितले की, ९९.७ % प्रौढ लोकसंख्येला आधारचा समावेश करण्यात आला आहे.
UIDAI ही आधार कार्ड बनवणारी अथॉरिटी लवकरच रुग्णालयांमध्ये नवजात बालकांना आधार कार्ड जारी करण्याची यंत्रणा बनवत आहेत. यासाठी रुग्णालयांमध्ये लवकरच नावनोंदणी प्रक्रिया सुरू करण्याचा प्रयत्न सुरु आहे. जर सर्वकाही योजनेनुसार झाले, तर बाळाचे जन्म प्रमाणपत्र येण्याच्या आधीच त्याचे आधार कार्ड तयार असेल. जन्माचा दाखला मिळण्यासाठी साधारण एक महिन्याचा कालावधी लागतो.
या योजनेअंतर्गत आतापर्यंत देशातील १३१ कोटी लोकसंख्येची नोंदणी पूर्ण करण्यात आली आहे. आता नवजात बालकांची त्वरित नोंदणी करण्याचा आमचा प्रयत्न आहे. ते पुढे म्हणाले की, दरवर्षी अंदाजे दोन ते अडीच कोटीच्या आसपास मुले जन्म घेतात. आम्ही त्यांची त्वरित आधार नोंदणी करण्याच्या प्रक्रियेत आहोत. बाळाच्या जन्माच्या वेळी केवळ त्याचा किंवा तिचा फोटो क्लिक करून आधार कार्ड दिले जाण्याची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. गर्ग म्हणाले की, आम्ही आधारकार्ड साठी ५ वर्षांखालील मुलांचे बायोमेट्रिक्स घेतले जाणार नाहीत, तर ते त्यांच्या पालकांपैकी एकाशी जोडण्यात येणार आहे. आणि बाळाने वयाची ५ वर्षे ओलांडल्यानंतर त्याचे बायोमेट्रिक्स घेतले जातील.
गेल्या वर्षी दुर्गम भागात आधार कार्ड बनविण्यासाठी १० हजार शिबिरे उभारण्यात आली. तेथे अनेक लोकांकडे आधार क्रमांक नसल्याचे सांगण्यात आले. या सरावात ३० लाख लोकांनी सहभाग घेतला होता. आम्ही २०१० साली पहिला आधार क्रमांक जारी केला होता. प्रथम आम्ही लक्ष केवळ जास्तीत जास्त लोकांची नोंदणी करण्यावर दिले. आणि आता आमचे लक्ष तो माहिती अपडेट करण्यावर आहे.
दरवर्षी सुमारे १० कोटी लोक त्यांचे नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करतात. १४० कोटी बँक खात्यांपैकी १२० कोटी खाती आधारशी जोडण्यात आली आहेत. येत्या काळात आधार हे मतदार कार्डाशीही जोडले जाणार आहे. बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत या विधेयकाला मंजुरी देण्यात आली आहे. निवडणुकीत बोगस मतदान रोखणे हा त्याचा उद्देश आहे.