25.2 C
Ratnagiri
Sunday, December 7, 2025

रेशन दुकानदारांची दिवाळी ‘कडू’, पालकमंत्र्यांना निवेदन देणार

जिल्ह्यातील रेशन दुकानदारांचे जुलै महिन्यापासून थकलेले कमिशन...

४४ कोटींच्या डांबर खरेदीत अनियमितता – बाळ माने

रत्नागिरी पालिकेत २०१४ ते २३ या कालावधीत...

खेर्डी-टेरव मार्ग होणार खड्डेमुक्त, बांधकाम विभागाचे आश्वासन

पुढील पंधरा दिवसांत खेर्डी-टेरव रस्त्यावरील सर्व खड्डे...
HomeRatnagiriअवकाळी पावसाने आंबा काजू व्यावसायिक धास्तावले, मोहोर लागला गळू

अवकाळी पावसाने आंबा काजू व्यावसायिक धास्तावले, मोहोर लागला गळू

रत्नागिरीमध्ये पडणाऱ्या अवकाळी पावसामुळे आंबा आणि काजू व्यावसायिक धास्तावले आहेत. साधारण थंडीला सुरुवात झाली कि, आंब्याला आणि काजूला बारीक मोहोर यायला सुरुवात होते. संपूर्ण कोकणामध्ये आमाबा आणि काजूचे उत्पादक अधिक प्रमाणात आहेत. परंतु पावसाचा सिझन संपला तरी सुद्धा या अवकाळी पडणार्या पावसाने आलेला मोहोर गळून पडून जात आहे.

जून महिन्यामध्ये सुरू झालेला पाऊस डिसेंबर महिना उजाडला तरी जाण्याची लक्षणच दिसत नाही आहेत. त्यामुळे हापूस आंबा संकटात सापडला आहे. मोठ्या प्रमाणात आंब्याच्या झाडांना पालवी फुटताना दिसत आहे. तसेच ज्या कलमांना मोहोर आलेला आहे तो या अवकाळी पावसाने कुजून जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळेच यावर्षीचा आंबा हंगाम लांबण्याची भीती व्यक्त होत आहे.

आंब्याच्या खत व्यवस्थापनापासून, लवकर मोहोर येण्यासाठी वापरत असलेले महागडे कल्टार आणि फवारणीसाठी येणारा खर्च वसूल होणे अवघड आहे. कोकणातील लोकप्रतिनिधींनी शेतकर्‍यांच्या या व्यथा शासन दरबारी मांडणे गरजेचे आहे. हवामान खात्याच्या निर्देशनानुसार येत्या काही दिवसात पाऊस पडण्याची शक्यता आहे. अस्मानी संकटाचा सामना आंबा, काजू बागायतदारांना करावा लागत असताना शासन स्तरावरून कोकणातील शेतकर्‍यांची मात्र कायमच परवड होत असल्याचे चित्र पाहायला मिळते.

राज्यातील विदर्भ, मराठवाडा, खानदेश, पश्चिम महाराष्ट्र इत्यादी विभागात अतिवृष्टी, गारपीट, वादळ वा अन्य कोणत्याही नैसर्गिक आपत्ती आल्यास तेथील लोकप्रतिनिधी पक्षभेद बाजूला सारून एक होतात आणि शेतकर्‍यांना मदत मिळावी यासाठी शासनावर एकत्रितरीत्या दबाव निर्माण करतात.

कोकणात मात्र परीस्थिती याच्या संपूर्ण उलट आहे. कोकणात मोठ्या प्रमाणावर आंबा आणि काजू लागवडीचे क्षेत्र आहे. शेतकरी मेहनत घेऊन वर्षभर पोटच्या मुलाप्रमाणे झाडांचे संगोपन करतो, औषध फवारणीसाठी लाखो रूपये खर्च करतो. पण प्रत्यक्षात ज्या वेळी पिकाचा हंगाम येतो तेव्हा निसर्ग दगा देतो. परंतु, निसर्गाच्या खेळापुढे शेतकऱ्याच्या पदरी मात्र निराशाच येत आहे.

RELATED ARTICLES

Most Popular