26.3 C
Ratnagiri
Tuesday, April 22, 2025

खराब तापमानामुळे सागरी मासेमारीवर परिणाम

सर्वसाधारणपणे गुढीपाडवा झाला की समुद्रात नव्याने मासळी...

शेकाप नेत्याच्या दोन मुलांसह भाच्याचा समुद्रात बुडून मृत्यू

शेतकरी कामगार पक्षाचे नेते जयंत पाटील यांचे...

रत्नागिरीत खेडशी परिसरात उपयुक्त पाळीव प्राणी मुंडकं छाटलेल्या स्थितीत सापडल्याने संताप

रत्नागिरी तालुक्यात रेल्वे स्थानकापासून काही अंतरावर खेडशी...
HomeRatnagiriकोकणात वंदे भारत ठरेल प्लेन ऑन व्हिल्स - प्रा. उदय बोडस

कोकणात वंदे भारत ठरेल प्लेन ऑन व्हिल्स – प्रा. उदय बोडस

वंदे भारतमधील सोयीसुविधा पाहता व तिकीटदर यांचा विचार करता अतिशय उत्तम सोयीसुविधा आहेत. सध्या कोकण रेल्वेमार्गावर वंदे भारतचा वेग ताशी ७५ असला तरीही ही गाडी जेव्हा १२० किमी गतीने जाईल तेव्हा मी या गाडीला रुळावरील विमान अर्थात् प्लेन ऑन व्हिल्स असे नाव देईन, असे गौरवोद्गार सीएमए प्रा. उदय बोडस यांनी काढले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वंदे भारतचे उद्घाटन काल केले. आजपासून व्यावसायिक प्रवास सुरू झाला. यापूर्वी ३ जूनला वंदे भारत एक्स्प्रेसच्या उद्घाटन फेरीच्या प्रवासाला आवश्यक पास त्यांनी मिळवला होता; पण दुर्दैवाने सोहळा रद्द झाला होता. त्यांनी आज पत्नी साधनासह रत्नागिरी- मडगाव असा प्रवास केला. १९९६ ला कोरे मार्गावर पहिली दादर पॅसेंजर निघाली.

त्या वेळेपासून कोकण रेल्वेमार्गावर जाणाऱ्या पहिल्या रेल्वेतून प्रवास करण्याचा आगळावेगळा विक्रम प्रा. उदय बोडस यांच्या नावावर आहे. कोकणात धावलेल्या प्रत्येक रेल्वेच्या पहिल्या प्रवासाचे ते साक्षीदार आहेत. त्यांनी २२ वेळा असा प्रवास केला व आजचा त्यांचा २३वा प्रवास होता. प्रा. बोडस म्हणाले, “आजची वंदे भारत गाडी ६० टक्के भरलेली होती. मडगाव येथे १५ मिनिटे लवकरच गाडी पोहोचली होती. वंदे भारतमध्ये अनेक सुविधा दिल्या आहेत. सेन्सरयुक्त दरवाजा आहे. दिव्यांगांसाठी स्वतंत्र प्रसाधनगृह आहे. प्रसाधनगृहाबाहेर वेटिंगसाठी बसणाऱ्यांना स्वतंत्र जागा आहे. गाडीचा धावता स्पीड स्क्रिनवर दिसतो. डिस्प्ले युनिट आहे.

२३ वा प्रवास, आसन क्रमांकही २३ – कोरेच्या प्रत्येक रेल्वेच्या उद्घाटनाच्या रेल्वेत प्रवासाचा विक्रम करताना जनशताब्दी, मांडवी, डबलडेकर, तेजस, विस्टाडोम यामधील प्रवास लक्षात राहण्यासारखाच आहे. आज वंदे भारतमध्ये आलोय. एकंदर पहिल्या रेल्वे प्रवासातील हा २३वा प्रवास आहे. यातही मी आसन क्र. २३ व २४ आरक्षित केले. माझ्यासोबत पत्नी साधनासुद्धा आहे. वंदे भारतमध्ये आजच्या प्रवासात आम्ही जेवणही मागवले. ते अतिशय उत्तम चवीचे, रूचकर जेवण होते. यात एकूण सहा पदार्थ होते, असे प्रा. बोडस म्हणाले.

RELATED ARTICLES

Most Popular