26.4 C
Ratnagiri
Friday, October 18, 2024

अखिल शेओरानचे लक्ष्य कांस्यपदक, दुसरे पदक भारताच्या झोळीत

ISSF विश्वचषक फायनल भारताची राजधानी नवी दिल्ली...

महिला मतदार ठरवणार दापोलीचा आमदार दापोली मतदारसंघ

विधानसभा निवडणूक जाहीर झाली असून, सर्वांनी आचारसंहितेचे...
HomeRatnagiriमिऱ्यातील गटार कामाने ग्रामस्थ त्रस्त

मिऱ्यातील गटार कामाने ग्रामस्थ त्रस्त

काम मिऱ्या बंदरपासून पांढरा समुद्रापर्यंत पूर्ण करायचे आहे.

मिऱ्या गावातील निर्माण झालेल्या गटार व मोऱ्यांच्या समस्यांबाबत ठेकेदाराने तत्काळ उपाययोजना कराव्यात. याचा गांभीयनि विचार न झाल्यास मिऱ्या गावातील शांतताभंग त्याची सर्वस्वी जबाबदारी ठेकादर व शासकीय अधिकाऱ्यांवर असेल, असा इशारा मिऱ्यावासीयांनी जिल्हाधिकारी, पालकमंत्री आदींना निवेदनाद्वारे दिला आहे. जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये खासदार विनायक राऊत यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेमध्ये उपमहाप्रबंधक, प्रकल्प संचालक, भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण याखात्याचे अधिकारी हजर होते.

त्यावेळी मिऱ्या-नागपूर महामार्गाच्या कामामुळे मिऱ्या गावात निर्माण झालेल्या गटार व मोऱ्यांच्या समस्यांबाबत उपाय योजना करण्याचा विषय झाला होता. तसे पत्र मिऱ्या-नागपूर राष्ट्रीय महामार्गाच्या कार्यकारी अभियंत्यांना ग्रुप ग्रामपंचायतीने दिले आहे. खासदारांनाही पत्र दिले आहे. सर्व विषयांची पूर्तता होऊनही मुळ ठेकेदार आणि संबंधित खात्याचे अधिकारी जाणीवपूर्वक स्थानिक गावातील लोकांना त्रास होईल, असे काम करीत आहेत. पावसाळ्यात काही ठिकाणी पाणी भरते.

पावसाळ्याचा विचार करता या विषयांवर गांभिर्याने विचार करावा. तो न केल्यास रस्त्यालगत असलेल्या घरामध्ये व काही ठिकाणी वस्तीमध्ये पाणी जाण्यासाठी मार्ग नसल्यामुळे मिऱ्या गावामध्ये पाणी भरण्याची शक्यता नाकारता येत नाही. या विषयामुळे गावामधील शांतताभंग, वादविवाद झाल्यास ठेकेदार व संबंधित शासकीय अधिकारी जबाबदार असतील, असे निवेदनात म्हटले आहे. रणजित भाटकर, दत्तगुरू कीर, मयुरेश पाटील, रविकिरण तोडणकर या शिष्टमंडळाने हे निवेदन दिले.

पालखी मिरवणुकीला होणार अडथळा – मिऱ्या-नागपूर महामार्गाचे काम मिऱ्या बंदरपासून पांढरा समुद्रापर्यंत पूर्ण करायचे आहे. परंतु गेले आठ दिवस हे काम धिम्या गतीने सुरू आहे. गावात शिमगोत्सव मोठ्या प्रमाणात असतो. जाकीमिऱ्या गावच्या दोन पालख्या मिरवणुकीने भैरीबुवाच्या भेटीला जातात. १४ मार्चला शिमगोत्सव आहे. तोपर्यंत रस्त्याचे काम पूर्ण न झाल्यास गैरसोय होणार आहे. अपुऱ्या रस्त्यामुळे अडथळा निर्माण होणार आहे. लवकरात लवकर काम पूर्ण करावे, अशी मागणी श्री नवलाई पावणाई देवस्थानने जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षकांना निवेदन दिले.

RELATED ARTICLES

Most Popular