26.5 C
Ratnagiri
Friday, December 19, 2025

नाताळ आणि नववर्षाच्या स्वागतासाठी कोकण रेल्वे मार्गावर धावणार विशेष गाडया

ख्रिसमसची सुट्टी आणि नववर्षाच्या स्वागतासाठी कोकणात येणाऱ्या...

बेकायदेशीर वाळू उपसा होताना दिसल्यास कारवाई होणार – जिल्हाधिकारी आक्रमक

बेकायदेशीर वाळू उत्खननाबाबत आलेल्या तक्रारीवरून आम्ही संगमेश्वरमध्ये...

रत्नागिरी शहरात भरवस्तीत बिबट्याच्या संचाराने घबराट

रत्नागिरी शहराच्या अगदी मध्यवर्ती आणि रहिवासी भाग...
HomeRatnagiriपाणी समजून “हे” प्यायल्याने महिलेचा ओढावला मृत्यू

पाणी समजून “हे” प्यायल्याने महिलेचा ओढावला मृत्यू

कोरोना अजून संपुष्टात न आल्याने, अजून देखील अनेकांच्या घरामध्ये अजूनही सॅनिटायझरच्या बाटल्या अस्तित्वात आहेत.

कोरोनाच्या काळामध्ये निर्जंतुकीकरण करण्यासाठी मोठ्या प्रमाणात सॅनिटायझरचा वापर करण्यात आला. काहीना ते मानवले तर काहीना त्यामुळे अनेक अडचणी निर्माण झाल्या. कोरोना अजून संपुष्टात न आल्याने, अजून देखील अनेकांच्या घरामध्ये अजूनही सॅनिटायझरच्या बाटल्या अस्तित्वात आहेत. काही वेळा नक्की बाटली कसली यावरून देखील संभ्रम अवस्था निर्माण होते. लहान मुलांपासून अशा प्रकारच्या बाटल्या दूरच ठेवण्यात येतात.

रत्नागिरी तालुक्यातील वाटद-खंडाळा इथे पाणी समजून महिलेने असं काही प्यायली की एका नेपाळी विवाहितेचा मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना घडली आहे. रत्नागिरी जिल्हा शासकिय रुग्णालयात उपचार सुरू असताना या महिलेचा मृत्यू झाला आहे. बुधवारी १२ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५.३० वा. उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची माहिती गुरुवारी रत्नागिरी पोलीसांनी दिली.

तुलसीदास पदम लामा वय २७, मुळ रा. नेपाळ सध्या रा. वाटद-खंडाळा, रत्नागिरी असे मृत्यूमुखी पडलेल्या विवाहितेचे नाव आहे. याबाबत तिचा पती पदम राम बहाद्दूर लामा वय २६,  मुळ रा. नेपाळ सध्या रा. वाटद-खंडाळा, रत्नागिरी याने जयगड पोलीस ठाण्यात खबर दिली. त्यानूसार, मंगळवार ११ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वा. तुलसीदास हिने राहत्या घरामध्ये नजरचुकीने पाणी समजून सॅनिटायझर प्यायली.

यानंतर काही वेळ गेल्यावर तिला अस्वस्थ आणि बैचेन वाटू लागल्याने पतीने तिला जिल्हा शासकिय रुग्णालयात दाखल केले होते. परंतू उपचारा दरम्यान बुधवारी सायंकाळी तिचा मृत्यू ओढावला. या घटनेची जयगड पोलीस ठाण्यात आकिस्मक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या प्रकरणी अधिक तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल किशोर धातकर करत आहेत.

RELATED ARTICLES

Most Popular