25.6 C
Ratnagiri
Tuesday, October 14, 2025

दहावी, बारावी बोर्ड परीक्षेसाठी राजमार्ग

कोकण व कोल्हापूर विभागीय मंडळाचे अध्यक्ष राजेश...

जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना नोटिसा…

आपापल्या जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्यकेंद्रांकडे दुर्लक्ष केल्याचा ठपका...

पूररेषेतील बांधकामांसाठी अटीत शिथिलता

शहरातील पूररेषेतील बांधकामांसाठी नगरविकास खात्याच्या नियमांमध्ये शिथिलता...
HomeRatnagiriव्हेल माशाच्या उलटीची तस्करी अडिच कोटींचा ऐवज केला जप्त

व्हेल माशाच्या उलटीची तस्करी अडिच कोटींचा ऐवज केला जप्त

व्हेल माशाच्या उलटीची तस्करी करणारा पोलिसांच्या जाळ्यात अलगद अडकला.

पोलिसांकडून डमी ग्राहकाने फोन केला… मोठं गिऱ्हाईक मिळालंय, अशी खात्री झाल्याने तो ठरलेल्या ठिकाणी आला… आणि व्हेल माशाच्या उलटीची तस्करी करणारा पोलिसांच्या जाळ्यात अलगद अडकला. शुक्रवार दि. १ ऑगस्टच्या रात्री हे थरारनाट्य घडले. शनिवार, १ ऑगस्टच्या रोजी रात्री एमआयडीसी पोलीस ठाणे हद्दीत लुप्तप्राय प्रजातीच्या माशाच्या उलटी विक्रीसाठी एकजण येणार असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर रत्नागिरीत ही मोठी कारवाई करण्यात आली. पोलीस अधिक्षक नितीन बगाटे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी डमी ग्राहकाच्या माध्यमातून हा सापळा रचला. रात्री १०.४५ वाजण्याच्या सुम ारास एमआयडीसी परिसरात संशयित व्यक्ती येताच त्याला ताब्यात घेण्यात आले. चौकशीत त्याचे नाव फजान अहमद, युसूफ मिरकर (वय, २१, रापिंगी मोहल्ला, मिरकरवाडा रत्नागिरी) असे असल्याचे समोर आले. त्याच्याकडून २.५ किलो वजनाची ‘व्हेल माशाची उलटी’ व ५०,०००/-रुपये रोख रक्कम असा एकूण २ कोटी ५० लाख ५० हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

याप्रकरणी आरोपीविरोधात प्राणी संरक्षण अधिनियम १९७२ अंतर्गत विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये कलम ३९, ४२, ४३, ४४, ४८, ५१, ५७ अंतर्भूत आहेत. ही कारवाई पोलीस अधीक्षक श्री… नितीन बगाटे, अपर पोलीस अधीक्षक बी.बी. महामुनी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. तपास पथकाद संदीप ओगले (पोलीस उप-निरीक्षक), पो. हे. कॉ. विनय आंबेकर, दिपक पाटील, विवेक सावंत, गणेश सावंत आणि चालक अब्दुल काझळे यांचा समावेश होता. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी फजान मिरकर याला डमी ग्राहकाकडून कॉल करण्यात आला. होता. मोठं गिऱ्हाईक मिळालंय, अशी खात्री झाल्याने तो व्हेल माशाची उलटी घेऊन ठरलेल्या ठिकाणी आला आणि पोलिसांच्या जाळ्यात अडकला. या प्रकरणाचा अधिक तपास रत्नागिरी ग्रामीण पोलीस करत आहेत.

RELATED ARTICLES

Most Popular