26.9 C
Ratnagiri
Saturday, August 30, 2025

वाहतूक कोंडीत अडकले राजापूर शहर…

दिवसागणिक वाहनांची आणि वाहने वापरणाऱ्यांची संख्या वाढत...

सवलतीच्या लाभासाठी ‘लालपरी’ला पसंती – रत्नागिरी विभाग

राज्य परिवहन महामंडळातर्फे लाडक्या लालपरीतून प्रवास करणाऱ्या...

दीड दिवसांच्या बाप्पाला भक्तांनी दिला भावपूर्ण निरोप

जिल्ह्यात दीड दिवसांच्या गणेशोत्सवाची गुरूवारी थाटामाटात सांगता...
HomeInternationalरशिया आणि युक्रेनच्या युद्धाचा भारतावर परिणाम

रशिया आणि युक्रेनच्या युद्धाचा भारतावर परिणाम

एकतर मागील दोन वर्षामध्ये कोरोनाच्या महामारीमुळे इतर व्यवसायांप्रमाणे, मद्य आणि बीअर विक्रीवर विपरीत परिणाम झाला होता.

रशिया आणि युक्रेन मध्ये सुरु असलेल्या युद्धाचा फटका जगाच्या राजकारणासह अर्थकारणालाही बसला आहे. या युद्धामुळे अनेक उद्योगांसमोरील आव्हानात भर पडली आहे. अशातच आता ऐन मोसमात बीअर कंपन्यांसमोरील अडचणीत वाढ होणार आहे. युक्रेन हा बीअर उत्पादनात महत्त्वाचा घटक असणाऱ्या बार्लीचे सर्वाधिक उत्पादन करणारा देश आहे. मात्र, सध्या युद्धाचा परिणाम जागतिक पुरवठ्यावर होण्याची शक्यता असून, त्यामुळे बीअरच्या दरामध्ये वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

एकतर मागील दोन वर्षामध्ये कोरोनाच्या महामारीमुळे इतर व्यवसायांप्रमाणे, मद्य आणि बीअर विक्रीवर विपरीत परिणाम झाला होता. त्यामुळे मागील दोन वर्षापासून कंपन्या आर्थिक संकटांचाच सामना करत आहेत. या वर्षी कोरोनाची लाट ओसरल्याने बीअरचा खप वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. मात्र, त्यावर आता या सर्व शक्यतांवर पाणी फिरण्याची लक्षणे दिसून येत आहेत.

रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेले युद्ध आणि वाढत्या आंतरराष्ट्रीय शेजारील राष्ट्रांच्या तणावाचा परिणाम जगभरातील शेअर बाजारांवर दिसून येत आहे. मग  भारतीय शेअर बाजारही त्याला अपवाद कसा अपवाद ठरेल ? आवड्याच्या पहिल्या व्यवहाराच्या दिवशी भारतीय शेअर बाजार मोठ्या घसरणीसह सुरु झाला असून, ९.३० वाजण्याच्या सुमारास सेन्सेक्स १०००ने धडधडून कोसळला आहे तर, निफ्टीत २४६ अंकांची घसरण झालेली दिसून येत आहे.

जागतिक स्तरावर रशिया-यूक्रेन यांच्यात सुरू असलेल्या युद्धामुळे पेट्रोलियम पदार्थांचे दर देखील गगनाला भीडले आहेत. त्यामुळे १ मार्च रोजी एलपीजी सिलेंडरचे नवे दर जाहिर करण्यात आले आहेत. व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या दरामध्ये १०५ रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. तर ५ राज्यांमध्ये निवडणुकाचे बिगुल वाजल्याने घरगुती सिलेंडरच्या दरात ७ मार्चनंतर वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

RELATED ARTICLES

Most Popular