‘तुम्हाला लोकं साहेब म्हणतात तो आदर कायम राहिला पाहिजे. पेंडींग हा शब्द पोषक नाही. मला रिझल्ट हवाय’ अशा कडक शब्दात खासदार नारायण राणे यांनी अधिकाऱ्यांना लस टोचली. गुरुवारी खा. नारायण राणे यांचा जनता दरबार जिल्हाधिकारी कार्यालयातील अल्पबचत सभागृहात पार पडला. यावेळी त्यांनी अधिकाऱ्यांसह काही तक्रारदारांनाही चांगलेच फटकारले. खा. नारायण राणे यांनी चिपळूणपासून जनता दरबार घ्यायला सुरुवात केली. गुरुवारी रत्नागिरीत जनता दरबार पार पडला. या जनता दरबारात अनेकांनी आपल्या व्यथा मांडल्या. आलेल्या प्रत्येकाची तक्रार ऐकून घेत जाग्यावरच त्यांनी अनेकांना न्याय देखील मिळवून दिला तर काही प्रकरणात आपण स्वतः लक्ष घालून तुमचे प्रश्न मार्गी लावून देईन असा विश्वास देखील त्यांनी यावेळी दिला. एस.टी.च्या कारभाराबाबत नाराजी सुरुवातीलाच एस.टी.च्या कारभाराबाबत ३ ते ४ तक्रार अर्ज आले. त्यामध्ये अन्यायपूर्वक बदली करणे तसेच मोबदला न देणे आणि एस.टी. फेऱ्या बंद करणे अशा स्वरुपाचे हे अर्ज होते. ते समोर येताच खासदार नारायण राणे चांगलेच संतापले.
सर्वांच्या तक्रारी ऐकून घेतल्या आणि मग त्यांनी विभाग नियंत्रकाना तात्काळ बोलावून घ्या असे फर्मान दिले. रिफायनरीबाबत पुन्हा आशादायी या जनता दरबारात एका तक्रारदाराने रिफायनरी यावी यासाठी आपली कैफियत मांडली. आज आमच्या परिसरात बेरोजगारी वाढली आहे, रोजगार नाहीत, आमच्या भागाचा सर्वांगिण विकास होत नाही. सर्व शेतकऱ्यांनी रिफायनरीसाठी संमती दिली आहे. त्यामुळे रिफायनीच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेण्यात यावी अशी मागणी केली. यावेळी खा. नारायण राणे यांनी सांगितले की पुढच्या १५ दिवसात राजापुरात आपण जनता दरबार घेऊ आणि हा प्रश्न देखील चर्चेतून कसा मार्गी लागतो ते पाहू असे आश्वासने दिले.
कठोर निर्बंध घाला – या जनता दरबारामध्ये अनेक मच्छिमार बांधव देखील सहभागी झाले होते. मच्छिमारांवर आसमानी संकट कोसळले असताना परप्रांतीय मच्छिमारांची घुसखोरी हे नवे संकट उभे राहिले आहे. या विरोधात अनेक तक्रारी आल्या. यावेळी परप्रांतीय मच्छिमारांवर कठोर निर्बंध घालण्यात यावेत असे आदेश त्यांनी दिले.
जयगड ग्रामपंचायत भ्रष्टाचार ? – यावेळी जयगड ग्रामपंचायतीच्या भ्रष्टाचाराबाबत तक्रार आली. खा. नारायण राणे यांनी तात्काळ जिल्हा परिषद अप्पर मुख्य कार्यकारी अधिकारी यांना यामध्ये लक्ष घालून कारवाई करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.
लांज्यातील घनकचरा गाजला – लांज्यातील घनकचरा प्रकल्पासंदर्भात गेले ८० दिवस आंदोलन सुरु आहे. येथील ग्रामस्थ उपोषणाला बसले आहेत. मात्र कोणताही अधिकारी भेटीसाठी अद्याप आला नाही अशी तक्रार करण्यात आली मग खा. नारायण राणे यांनी तक्रारदाराची देखील शाळा घेतली आणि प्रशासनाला देखील खडेबोल सुनावले.
चौकशीचे आदेश – या घनकचरा प्रकल्पावरून जे आंदोलन सुरु आहे त्याबाबत भाजपच्याच लांज्यातील बड्या पदाधिकाऱ्याने जनता दरबारात तक्रारवजा आपली व्यथा मांडली. त्यावरुन खा. नारायण राणे यांनी जिल्हा प्रशासनाला काही सवाल केले. हा प्रकल्प आला त्यावेळी नोटीफिकेशन काढले होते का? जर नोटीफिकेशन काढले असेल तर जनतेच्या हरकती आल्या होत्या का हे तपासून पुढच्यावेळी यावर योग्य तो निर्णय घेतला जाईल असे सुतोवाच खा. नारायण राणे यांनी केले.
तात्काळ अटक करा – जनता दरबारामध्ये पोलिस विभागाविरोधात तीन ते चार तक्रार अर्ज आले होते. त्यातील दोन तक्रार अर्ज गंभीर होते. रत्नागिरीतील आरजू टेक्सॉल कंपनीतील आर्थिक फसवणूकीविरोधात स्थानिक महिलांनी तक्रार केली. दोन आरोपींना अटक

 
                                    