26.8 C
Ratnagiri
Friday, November 22, 2024

OPPO Find X8, Find X8 Pro डायमेंसिटी 9400 प्रोसेसर, AMOLED डिस्प्लेसह लॉन्च…

OPPO ने अलीकडेच आपले फ्लॅगशिप स्मार्टफोन OPPO...

‘पुष्पा 2: द रुल’, अल्लू अर्जुनची जादू पुन्हा चालेल…

2021 च्या ब्लॉकबस्टर चित्रपट 'पुष्पा: द राइज'चे...
HomeRatnagiriआजपासून मच्छीमारीला आरंभ वातावरण पोषक नसल्याने चिंता

आजपासून मच्छीमारीला आरंभ वातावरण पोषक नसल्याने चिंता

कांडाळीद्वारे मच्छीमारी करणाऱ्या छोट्या नौका लोटण्यास सुरूवात झाली आहे.

दोन महिन्यांच्या बंदी कालावधीनंतर खोल समुद्रातील मच्छीमारीला मंगळवार १ ऑगस्टपासून सुरुवात होत आहे. मात्र समुद्र खवळलेला असून वातावरण पोषक नसल्याने यांत्रिकी नौका सध्या सिंधुदुर्गात देवगड तर रत्नागिरीतील मिरकरवाडा तसेच दापोलीतील हर्णे, जयगड आदी प्रमुख बंदरातच उभ्या आहेत. तर कांडाळीद्वारे मच्छीमारी करण्यास सुरुवात होण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने मच्छीमार तयारीला लागल्याचे चित्र दिसत आहे. पावसाळी तसेच समुद्र खवळलेल्या स्थितीत असलेल्या वातावरणामुळे यांत्रिकी नौकांद्वारे मच्छीमारी सुरू होण्यास आणखी काही दिवस लागतील, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. १५ ऑगस्टनंतरच यांत्रिकी नौकांद्वारे मच्छीमारीस सुरुवात होण्याची शक्यतां मत्स्य व्यवसायिक हनिफ मेमन त्यांनी व्यक्त केली.

कांडाळीद्वारे मच्छीमारी करणाऱ्या छोट्या नौका लोटण्यास सुरूवात झाली आहे. ऑगस्टपासून नव्या मच्छीमारी हंगामाला सुरुवात झाल्याने किनारपट्टी भाग गजबजू लागला आहे. देवगड बंदरातील समुद्रातील वातावरण पोषक नसल्याने मोठ्या नौका जरी समुद्रात मच्छीमारीसाठी जात नसल्या तरी काही प्रमाणात छोट्या नौका मच्छीमारीसाठी जाण्याच्या तयारीला लागल्या असून कांडाळीद्वारे मच्छीमारी व्यवसाय सुरू होण्याची शक्यता आहे. सध्या समुद्र खवळलेला असून लाटांचे तांडव आहे. अशा प्रतिकूल परिस्थितीत खोल समुद्रातील मच्छीमारी करणे अशक्य असले तरी कांडाळीद्वारे सहा ते सात वावात मच्छीमारी करण्यासाठी मच्छीमार सज्ज झाला आहे. सध्या खाडीतील मच्छीमारी सुरू असून सुळा, दोडी आदी मासळी मिळते. मात्र तीही कमी प्रमाणात मिळत आहे. यामुळे दरही वधारले आहेत. १ ऑगस्टपासून खोल समुद्रातील मच्छीमारी सुरू होत असल्याने खोल समुद्रातील ‘बांगडा, सुरमई आदी चविष्ट मासळीचा आस्वाद चाखण्याची खवय्यांना संधी आहे.

RELATED ARTICLES

Most Popular