27.6 C
Ratnagiri
Sunday, August 31, 2025

कोत्रेवाडीतील कचरा प्रकल्पाला विरोध कायम, उपोषणकर्त्यांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

कोत्रेवाडी येथील प्रस्तावित डंपिंग ग्राऊंड हटावसाठी ग्रामस्थांनी...

आरवली-संगमेश्वर ते बावनदी येथील खड्डे जैसे थे

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी आरवली-संगमेश्वर ते बावनदी...

मुंबई-गोवा महामार्गासाठी ना. योगेश कदम यांचे गणपतीबाप्पाला साकडे

पुढच्या वर्षी महामार्ग पूर्ण होईल असे दरवर्षी...
HomeRatnagiriजिल्हास्तरीय युवा महोत्सवाचे ऑनलाईन पद्धतीने आयोजन

जिल्हास्तरीय युवा महोत्सवाचे ऑनलाईन पद्धतीने आयोजन

दि. १ जानेवारी २०२२ रोजी जिल्हास्तरीय युवा महोत्सवाचे आयोजन जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या वतीने सकाळी ११.०० वा. ऑनलाईन पद्धतीने आयोजित करण्यात आले आहे.

दि. १ जानेवारी २०२२ रोजी जिल्हास्तरीय युवा महोत्सवाचे आयोजन जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या वतीने सकाळी ११.०० वा. ऑनलाईन पद्धतीने आयोजित करण्यात आले आहे. जिल्हास्तरीय युवा महोत्सवात लोकनृत्य स्पर्धेसाठी सहभागी युवा एकूण संख्या २० असून त्यासाठी १५ मि. वेळ दिली जाणार आहे तर लोकगती स्पर्धेसाठी  १० युवा संख्या असून वेळ सात मिनिटे असणार आहे.

युवा महोत्सवात सहभागी होण्यासाठी रत्नागिरी जिल्ह्यातील १५ ते २९ वयोगटातील युवक युवतींनी उपरोक्त दि. ३१ डिसेंबर २१ सायं ५ वाजेपर्यत आपली प्रवेशिका विहित नमुन्यात, वयाच्या व रहिवाशी दाखल्यासह जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जिल्हा क्रीडा संकुल, एम. आय. डी. सी. मिरजोळे, रत्नागिरी येथे कार्यालयीन वेळेमध्ये अथवा प्रत्यक्ष येणे शक्य नसेल तर ई-मेल द्वारा विहीत कालावधीत पाठवावी. त्यासाठी या ई-मेल-ratnagiridso@gmail.com, कार्यालयात संपर्क श्री. सचिन मांडवकर, क्रीडा मार्गदर्शक संपर्क क्र. ८४०८८६५८७० यांच्याशी करावा. असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी श्री. किरण बोरवडेकर यांनी केले आहे. स्पर्धेत भाग घेण्यासाठी नियमवाली आखलेली असून ती पुढीलप्रमाणे आहे.

केंद्र शासनाने वेळोवेळी निश्चित केलेल्य निकषाप्रमाणे सहभागी युवा १५ ते २९ वयोगटातील असावा. १ जानेवारी १९९३ ते १ जानेवारी २००७ यामधील जन्मदिनांक असावी. सहभागी होणारा युवा हा महाराष्ट्रातील आणि रत्नागिरी जिल्ह्यातील रहिवासी असणे बंधनकारक आहे. लोकगीत, लोकनृत्य या प्रकारातील गीत असणे आवश्यक आहे. युवा महोत्सवाच्या दरम्यान येणा-या तक्रारीचे निवारण करण्याकरीता राज्य, विभाग आणि जिल्हा स्तरावर त्रिसदस्यीय तक्रार समिती नियुक्त करण्यात येणार आहे आणि समितीचा निर्णय हा अंतिम राहणार आहे.

RELATED ARTICLES

Most Popular