26.4 C
Ratnagiri
Sunday, August 3, 2025

मुहूर्ताच्या दिवशी पावसाचा खोडा केवळ २० टक्के नौका समुद्रात

शुक्रवारपासून मासेमारीवरील बंदी उठल्यानंतर पहिल्याच दिवशी स्थानिक...

“आम तो आम और गुटली का भी दाम” असा हा प्रकल्प : अनिकेत सुर्वे

"आता वाटद दशक्रोशीतील युवकांनी निर्धार केला आहे,...

स्मार्ट वीजमीटरचा निर्णय रद्द करायला लावू – लियाकत शाह

स्मार्ट वीजमीटर बसवल्यानंतर वाढीव वीजबिले येत असल्याच्या...
HomeRatnagiriउद्यमनगर चंपक मैदानासमोर क्रीडा शिक्षक ओंकार बाणे याचे अपघातात निधन

उद्यमनगर चंपक मैदानासमोर क्रीडा शिक्षक ओंकार बाणे याचे अपघातात निधन

रत्नागिरीतील तरुण क्रीडा शिक्षकाचा परटवणे येथून साळवी स्टॉपच्या दिशेने निघाले असताना गुरे आडवी आल्याने झालेल्या अपघातात मृत्यू झाला आहे.

रत्नागिरी तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात उनाड गुरांचा प्रश्न मार्गी लागणे गरजेचे आहे. काळोख्या रस्त्यात मध्यवर्ती बसून राहिल्याने, अनेकदा वाहनचालक बाचकतात आणि अपघात घडतो. अचानक समोर रस्त्यात आडवी झोपलेली गुरे दिसल्याने वाहनावरील ताबा सुटण्याची शक्यता मोठ्या प्रमणात असते. अनेक वेळा या गुरांचा आणि भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी अनेक उपाययोजना योजण्याची पालिकेकडे मागणी करण्यात आली आहे परंतु, तात्पुरती व्यवस्था करून विषय पुन्हा जैसे थे च राहत आहे.

रत्नागिरीतील तरुण क्रीडा शिक्षकाचा परटवणे येथून साळवी स्टॉपच्या दिशेने निघाले असताना गुरे आडवी आल्याने झालेल्या अपघातात मृत्यू झाला आहे. उद्यमनगर, चंपक मैदानासमोर रस्त्यात गुराला धडकून दुचाकीस्वार क्रीडा शिक्षक ओंकार बाणे रस्त्यात कोसळला. रस्त्यावर डोकं जोरात  आपटल्याने ओंकार बाणे याचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. सोमवारी रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला.

ओंकार बाणे रात्री साडे दहा वाजेपर्यंत घरीच होता. रात्री  तो त्याची दुचाकी घेऊन शहरात आला. रात्री घरी जाण्यासाठी  निघाला असताना ११.३० वाजण्याच्या सुमारास उद्यमनगर  चंपक मैदानासमोर गुराला धडकल्याने त्याच्या दुचाकीचा गंभीर  अपघात झाला. त्या रस्त्याला उशिरा जास्त रहदारी नसते त्यांमुळे बराच वेळ तो रस्त्यात जखमी अवस्थेत पडलेला होता. यानंतर त्याला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल  करण्यात आले होते. मात्र डोक्याला जोरदार मार लागल्याने, उपचारा दरम्यान त्याचा मृत्यू ओढवला. अशा तरुण तडफदार क्रीडा शिक्षकाचे दुर्दैवी निधन झाल्याने, सर्व स्तरातून हळहळ व्यक्त होत आहे. अनेक क्रीडा स्पर्धामध्ये ओंकारचा सहभाग असायचा, त्यामुळे मित्र परिवार सुद्धा विशाल होता.

RELATED ARTICLES

Most Popular