भारताचा माजी क्रिकेटपटू युवराज सिंगला हरियाणाच्या हांसी इथे हिसार पोलिसांनी १७ ऑक्टोबरच्या रात्री उशिरा अटक केली. तसेच थोडया वेळामध्ये त्याला जामिनही मंजूर झाला. पण अचानक काय झाले आणि नेमक्या कोणत्या प्रकरणामुळे युवराजवर अटकेची कारवाई झाली?
मिळालेल्या माहितीनुसार, अनुसूचित जाती विरोधात अपमानास्पद वक्तव्य केल्या प्रकरणी युवराजवर गुन्हा दाखल केला गेला आहे. मागील वर्षी रोहित शर्मासोबत लाइव्ह चॅट करताना युजर्वेंद्र चहल या भारतीय खेळाडूवर अनुसूचित जातीबद्दल अपमानास्पद शब्द उच्चारल्याचा आरोप युवराजवर आहे.
याप्रकरणी सामाजिक कार्यकर्ते रजत कलसन यांनी पोलिसांकडे तक्रार केली. युवराजनं युजवेंद्र चहलला उद्देशून बोलताना भंगी या शब्दाचा वापर केला होता. एकेकाळी हा शब्द मैला वाहून नेणाऱ्या विशिष्ट जातीच्या व्यक्तींसाठी कथित उच्चवर्णीयांकडून वापरण्यात येत होता. त्यात समोरच्या व्यक्तीला कमीपणा दाखवून अपमान करण्याची भावना दडलेली असायची.
या प्रकरणी युवराजने जगासमोर आपली चूक मान्य असून, सोशल मीडियावर एक सविस्तर पोस्ट लिहून त्याने माफी मागितलेली. यासाठी त्याने ट्वीट करत एक पत्र पोस्ट केलंय. यात युवराजने म्हटले आहे की, मला हे स्पष्ट करायचं आहे की, मी कधीही जाती, रंग, वर्ण आणि लिंगाबाबत कोणत्याही प्रकारच्या असमानतेवर विश्वास ठेवलेला नाही.
मी कायम लोकांच्या भल्यासाठी माझे आयुष्य व्यतीत केले आहे आणि आजही मी चालू ठेवले आहे. मी माझ्या सहज मित्राशी बोलत असताना, माझा मुद्दा चुकीच्या अर्थाने घेतला गेला, जो निराधार आहे. तथापि, मी एक जबाबदार भारतीय नागरिक असल्याने, मी हे सांगू इच्छितो कि, जर अजाणतेपणी मी कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर मला त्याबद्दल खेद वाटतो. माझे भारत आणि तेथील लोकांवर कायमच प्रेम राहील.
उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर युवराज चंदीगडला पोहोचला. तिथे त्याला हिसार पोलिसांनी त्याला अटक केली. पोलिसांनी त्याची चौकशी केली आहे. अटकेनंतर हिसार जिओ मेसमध्ये युवराजची चौकशी करण्यात आली. यानंतर, उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार त्याची औपचारिक जामिनावर सुटका करण्यात आली आहे.