27 C
Ratnagiri
Saturday, July 27, 2024

कोकणातील मच्छीमार सहकार संस्था बंद होण्याच्या स्थितीतः आ. साळवी

रत्नागिरी जिल्हयातील मच्छीमारांच्या समस्या व मागण्यांबाबत मत्स्यव्यवसाय...

कोकण रेल्वेचे दुपदरीकरण होणार, वीर ते चिपळूण पहिला टप्पा करण्याचा निर्धार

कोकण रेल्वेचे दुपदरीकरण टप्प्याटप्यांनी करण्याचा निर्णय घेण्यात...

शेअर्स मार्केट मधून भरपूर पैसे कमावण्याचे आमिष दाखवुन फसवणूक

शेअर्स मार्केट मधून भरपूर पैसे मिळवून देण्याचे...
HomeRatnagiriउमेदवार शकील सावंतांचे कौतुकास्पद कार्य !

उमेदवार शकील सावंतांचे कौतुकास्पद कार्य !

श्री. शकील अब्दुल करीम सावंत हे निवडणूक रिंगणात उतरले आहेत.

लोकप्रतिनिधी कसा असावा याचा आदर्श जणू आज लोकसभा उमेदवार श्री. शकील सावंत यांनी घालून दिला! श्री. शकील सावंत यांनी राजापूर स्टँडवर जे काही केले ते पाहून अनेकांनी त्यांना शाब्बासकीची थाप दिली व ‘असेच कार्य करा’ म्हणून शुभेच्छा दिल्या! रत्नागिरी, सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघातून श्री. शकील अब्दुल करीम सावंत हे निवडणूक रिंगणात उतरले आहेत.

राजापूर स्टँडला भेट – श्री. शकील सावंत हे आज निवडणूक प्रचारासाठी राजापूर दौऱ्यावर होते. राजापूर येथे आगमन होताच त्यांनी राजापूर स्टँडला भेट दिली. त्यावेळी काही वयोवृध्द प्रवासी भगिनी सोबतचे अवजड सामान उचलून बसमध्ये कसे ठेवायचे या चिंतेमध्ये असल्याचे त्यांना आढळले. त्यांनी तत्परतेने त्या वृध्द भगिनींना सहकार्याचा हात दिला.

पोती बसमध्ये ठेवली! – स्वतः उमेदवार श्री. शकील सावंत यांनी त्या वृध्द महिलांकडे असलेले सामान उचलून भराभर एसटी बसमध्ये नेऊन ठेवले. सामानाची अवजड पोती होती, ती देखील त्यांनी उचलून बसमध्ये नेऊन ठेवली. यावेळी त्यांनी आपण लोकसभा निवडणुकीला उभे असल्याचे सांगून आपल्या प्रचाराचे पत्रकही त्या महिलांना दिले.

मुक्तकंठाने कौतुक! – श्री. शकील सावंत यांनी स्वतःहून उत्स्फूर्तपणे हे जे सहाय्य केले त्याबद्दल त्या भगिनींनी त्यांना धन्यवाद दिले. हे सर्व स्टँडवर असलेली मंडळी पहात होती. त्यांना जेव्हा समजले की. सहाय्य करणारे हे सदगृहस्थ लोकसभेचे उमेदवार आहेत तेव्हा त्या सर्वांनी त्यांचे मुक्तकंठाने कौतुक केले व त्यांना शुभेच्छा दिल्या!

सावंत पॅलेस हॉटेलचे मालक – श्री. शकील सावंत हे उच्च विद्याविभूषित असून नोकरी व्यवसाया निमित्त ते दुबईमध्ये काही काळ होते. तेथून आल्यानंतर त्यांनी रत्नागिरीत सुप्रसिध्द ‘सावंत पॅलेस हॉटेल’ उभारले. ‘सावंत पॅलेस हॉटेल’ हे केवळ रत्नागिरीतच नव्हे तर साऱ्या कोकणातील ते प्रथम दर्जाचे तारांकित हॉटेल म्हणून ओळखले जाते.

इतरांनी आदर्श घ्यावा! – श्री. शकील सावंत हे कोकण प्रादेशिक पक्षातर्फे लोकसभा निवडणुक रिंगणात उतरले आहेत. त्यांचे चिन्ह ‘म ाईक’ हे आहे. श्री. शकील सावंत एक प्रगतीशील, सुधारणावादी व आधुनिक विचारांचे पाईक म्हणून ओळखले जातात. राजापूर स्टँड येथे त्यांनी उत्स्फ र्तपणे वृध्द महिलांना जे सहाय्य केले त्याचा आदर्श आता मतदार संघातील सर्व उमेदवारांनी घ्यावा व तसे कार्य करावे असे मत याबाबत बोलताना अनेकांनी व्यक्त केले!

RELATED ARTICLES

Most Popular