26.3 C
Ratnagiri
Tuesday, July 15, 2025

सावर्डेत मत्स्यपालन, कुक्कूटपालन, कृषी पर्यटनाची शेतीला जोड

वडिलोपार्जित पारंपरिक शेतीला बाजारातील मागणीचा लाभ घेऊन...

चिपळुणात सदोष स्मार्ट मीटर बसवू नका…

स्थानिकांचा विरोध असतानाही अदानी पॉवर कंपनीने जुने...

चिपळूण घरकुलाचे स्वप्न जमीनदोस्त, तहसीलदारांकडे तक्रार

तालुक्यातील कादवड-सुतारवाडी येथील शासकीय योजनेतून मंजूर झालेल्या...
HomeDapoliगुहागर मिळणार नसेल तर चिपळूण, दापोली, खेड-मंडणगडमध्येही लढू, भाजप X शिवसेना

गुहागर मिळणार नसेल तर चिपळूण, दापोली, खेड-मंडणगडमध्येही लढू, भाजप X शिवसेना

महायुतीत गुहागरच्या जागेवरून वाद पेटण्याची शक्यता आहे.

गुहागर विधानसभा मतदारसंघ हा आमचा हक्काचा मतदारसंघ आहे. महायुती म्हणून लढताना तो आम्हाला मिळाला पाहिजे. हक्काच्या मतदारसंघावर देखील शिवसेना दाबा करणार असेल आणि तो लढवण्यावर ठाम असेल तर मग महायुतीला अर्थ काय? ‘आम्हीही गुहागरसह चिपळूण, दापोली-खेड- मंडणगड या मतदारसंघातही निवडणूक लढवू असा इशारा भाजपच्या कार्यकर्त्यांनी दिला आहे. त्यामुळे महायुतीत गुहागरच्या जागेवरून वाद पेटण्याची शक्यता आहे. जिल्ह्यातील ५ मतदारसंघांपैकी गुहागर-चिपळूण-खेड विधानसभा मतदारसंघ महायुतीच्या जागा वाटपात भाजपला मिळेल अशी अपेक्षा कार्यकर्त्यांना होती, अजूनही आहे.

केवळ दावा करून शिवसेना थांबली नाही तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र खा. श्रीकांत शिंदे यांचे मेहूणे विपूल कदम यांना उमेदवारी देण्यात येणार असल्याचेही सांगितले जावू लागले आहे. २०१९च्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघात शिवसेनेचा उमेदवार निवडून आला आहे. शिवसेनेचा उमेदवार धनुष्यबाण चिन्हावर या मतदारसंघातून विजयी झाला आहे. आज येथील आमदार शिंदेंच्या शिवसेनेसोबत नसले तरी मतदारसंघ त्यावेळी शिवसेनेने जिंकला होता आणि त्या बळावर गुहागर मतदारसंघावर आम्ही दावा करत आहोत. शिवसैनिकाला येथून उमेदवारी मिळेल असे शिवसैनिकांचे म्हणणे आहे.

तर ५ पैकी एकाही मतदारसंघात मित्रपक्ष म्हणून भाजपला संधी मिळणार नसेल तर महायुती काय कामाची? गुहागरची जागा हक्काची आहे ती मिळणार नसेल तर आम्ही चिपळूणसह खेड-दापोली-मंडणगडसह गुहागर अशा तिनही मतदारसंघांमध्ये स्वबळावर लढू असा इशारा दापोलीतील भाजपच्या कार्यकर्त्यांनी दिला आहे. या मुद्यावरून आता भाजप आणि शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये चांगलीच जुंपली असून या मतदारसंघांबाबत दोन्ही पक्षांचे वरिष्ठ नेते काय निर्णय ‘घेतात याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

RELATED ARTICLES

Most Popular