25.4 C
Ratnagiri
Thursday, October 5, 2023

दोन महामार्गाचे काम अद्याप अर्धवत, तिसऱ्या महामार्गाला मंजुरी

मुंबई-गोवा महामार्ग आणि रेवस-रेड्डी महामार्गाचे काम अद्यापही...

भाट्ये, कर्ला समुद्रकिनारी पाण्याला जोरदार करंट

मुसळधार पाऊस आणि जोरदार वाऱ्यामुळे रत्नागिरीतील भाट्ये...

आमदार भास्कर जाधव सरकारविरोधात न्यायालयात

आमदार भास्कर जाधव यांनी आमदार निधीवाटपात दुजाभाव...
HomeRatnagiriतरुणाईमधील वाढते मद्यपान धोक्याचे, सार्वजनिक ठिकाणीच ओपन बार

तरुणाईमधील वाढते मद्यपान धोक्याचे, सार्वजनिक ठिकाणीच ओपन बार

सार्वजनिक ठिकाणी मद्य प्राशन करणाऱ्या तीन तरुणांविरुद्ध ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मद्यप्राशन करणाऱ्या तरुणांचे प्रमाण वाढले आहे. शहरातील साळवी स्टॉप, झाडगाव, मुरुगवाडा, आठवडा बाजार, प्रमोद महाजन क्रीडासंकुल परिसर, चंपक मैदान, उद्यमनगर, नाचणे येथील सार्वजनिक ठिकाणी मद्यप्राशन करताना मद्यपी दिसतात. काहीवेळा पोलिसांची नजर चुकवण्यासाठी आडोशाला तसेच झाडीझुडपाचाही आधार मद्यपी घेत आहे. यावर अंकुश ठेवण्यासाठी शहर व ग्रामीण पोलिसांकडून सार्वजनिक ठिकाणी मद्य प्राशन करणाऱ्यांवर धडक कारवाई सुरू आहे. आजची तरुण पिढी मद्याच्या आहारी जाऊ लागली आहे. सार्वजनिक ठिकाणीच ओपन बार वाढू लागले आहेत. त्यावर पोलिसांनी गेल्या काही दिवसांपासून करडी नजर ठेवली आहे. मंगळवारी (ता. २२) सायंकाळी उद्यमनगर-चंपक मैदान येथे सार्वजनिक ठिकाणी मद्य प्राशन करणाऱ्या तीन तरुणांविरुद्ध ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सैफ काझी, आकीब अलजी, शुभम देसाई, तेजस देसाई अशी संशयितांची नावे आहेत. मंगळवारी रात्रीच्या वेळी चंपक मैदान येथे हे तरुण मद्य प्राशन करत होते. यापूर्वी पोलिसांकडून केलेल्या कारवाई प्रौढ व तरुणाईने आठवडा बाजार येथील पालिकेच्या पाण्याच्या टाकीचा आधार शोधला होता. त्यानंतर साळवी स्टॉप येथील जलतरण टँक परिसराचा आधार घेतला होता. त्यानंतर एमआयडी, झाडगाव, मुरूगवाडा येथे झाडीझुडपात मद्य प्राशन करत असताना पोलिसांनी हटकले होते. या प्रमाणात दिवसेंदिवस वाढ होत असून, तरुणाईसह प्रौढांचाही समावेश आहे. मद्याच्या नशा भिनल्यानंतर मद्यपींच्यात हाणामारीचेही प्रकार शहरात वारंवार घडत आहेत.

तालुक्यातील ग्रामीण भागातील गणपतीपुळे, जाकादेवी, खंडाळा, मालगुंड समुद्रकिनारी मद्य प्राशन करणाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. मद्यप्राशन करणाऱ्यांमध्ये कारणे कोणतीही असोत ‘पिनेवाले को सिर्फ बहाना चाहिए’ अशी सद्यस्थिती शहर व ग्रामीण भागात झाली आहे. पोलिसांकडून यावर अंकुश ठेवण्याचे काम सजगतेने सुरू आहे. तरीदेखील मद्यप्राशन करणारे सार्वजनिक ठिकाणचा वापर जास्त प्रमाणात करत असल्याचे चित्र आहे. शहरातील चंपक मैदान येथे पोलिसांनी केलेल्या कारवाईत तीन तरुण मद्य प्राशन करत असताना आढळले. पोलिसांनी चौकशी केली असता त्यांच्या मद्य प्राशन करण्याचा परवानाही नव्हता. या प्रकरणी पोलिसांनी ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरून पोलिसांनी संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांकडून ओपन बार वरील कारवाईची मोहीम अशीच सुरू राहणार आहे.

RELATED ARTICLES

Most Popular