32.7 C
Ratnagiri
Friday, March 14, 2025

चिपळूण – कऱ्हाड रेल्वेमार्गाचे स्वप्न अधांतरीच, खासदार तटकरे यांचे आश्वासनही हवेत

राज्याच्या अर्थसंकल्पात चिपळूण-कऱ्हाड रेल्वेमार्गासाठी आर्थिक तरतूद करण्यात...

राजापूर तालुक्यात डॉक्टर नियुक्तीमधील धरसोडीमुळे संताप

प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये एमबीबीएस डॉक्टर नसताना कंत्राटी...
HomeChiplunवाशिष्ठीतील गाळ उपशासाठी यंत्रसामुग्री वाढवा आमदार निकम

वाशिष्ठीतील गाळ उपशासाठी यंत्रसामुग्री वाढवा आमदार निकम

सध्या तीन पोंकलॅन आणि सहा डंपर कार्यरत असले तरी यंत्रसामुग्री कमी आहे.

वाशिष्ठो नदीतील गाळ उपसा कामासाठी पुरेसा निधी उपलब्ध आहे, तिथे यंत्रस्रामुग्री वाढवण्यात यावी, पंधरा दिवसांनी बैठक घेऊन या कामाचा आढावा घ्यावा, अशा सूचना आमदार शेखर निकम यांनी सावर्डे येथे आयोजित बैठकीत अधिकान्यांना केल्या. तसेच उपसलेला गाळ योग्य त्या ठिकाणी टाकण्यासाठी पाटबंधारे व महसुल विभागाने नियोजन करावे, असेही त्यांनी सांगितले. गाळ वाशिष्ठी नदीतील उपसाबाबत आमदार निकम यांच्या उपस्थितीत प्रांताधिकारी आकाश लिगाडे, तहसीलदार प्रवीण लोकरे, पाटबंधारे कार्यकारी अभियंता गणेश सलगर, उपविभागीय अभियंता विपूल खोत, मुख्याधिकारी विशाल भोसले, प्रशासकीय अधिकारी मंगेश पेढांबकर, जलसंपदा यांत्रिकी विभागो साळुंखे, बाथ समितो बापू काणे, अरुण भोजने, राजेश वाजे, उदय ओतारी, महेंद्र कासेकर, उमेश काटकर, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष नितिन उसाळे, संतोष तडसरे, मिलींद कापडी आदीची बैठक झाली.

या बैठकीत नदीतील गाळ उपसाबाबतच्या नियोजनावर चर्चा झाली. गतवर्षीपर्यंत काढण्यात आलेला आणि सद्यःस्थितीत सुरू असलेल्या उपसाबाबतचा अहवाल पाटबंधारेकडून मांडण्यात आला. त्यावर बचाव समिती सदस्यांकडून प्रश्न उपस्थित करण्यात आले. सध्या तीन पोंकलॅन आणि सहा डंपर कार्यरत असले तरी यंत्रसामुग्री कमी आहे. महापुरानंतर चिपळूणला मिळालेली यंत्रसामुग्री साताऱ्यासह इतरत्र परस्पर नेण्यात आली, यावरही तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त करण्यात आली. आमदार निकम यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी बैठकीतून संपर्क साधत सातारा येथे नेण्यात आलेले सात डंपर तत्काळ चिपळूणला परत पाठवण्याबाबत सूचना केल्या. डिझेल वापराचे आरोप आणि त्या संदर्भात आवश्यक ती खबरदारी यापुढे पाटबंधारे अधिकाऱ्यांनी घ्यावी, असे प्रकार आढळून आल्यास तत्काळ कारवाई करावी, असेही बजावले. यावर्षी निधीची कमतरता भासणार नाही. पावसाळ्यासाठी पाच महिने अजून शिल्लक असल्याने गाळ उपसा वेगाने करा. गाळ टाकण्यासंदर्भात असलेल्या अडचणी महसूल अधिकाऱ्यांबरोबर सोडवा, अशा सूचनाही अधिकाऱ्यांना केल्या.

संस्थांना सहभागी करून घेणार – गोवळकोटच्या मुखाशी आलेला गाळ हा मेरीटाईम बोर्डाच्या अखत्यारीत येत असल्याने निर्माण होणाऱ्या अडचणी, शहरात गांधारेश्वरपर्यंत कशा पद्धतीने गाळ काढला जावा, यादृष्टीने चर्चा करताना मंत्री नीतेश राणे, पालकमंत्री उदय सामंत याबरोबर बैठक घेण्याच्या दृष्टीने तसा गाळ उपसा मोहिमेत सामाजिक संस्थांनाही सहभागी करून घेण्यावरही चर्चा करण्यात आली.

RELATED ARTICLES

Most Popular