23.5 C
Ratnagiri
Thursday, December 12, 2024

पारंपरिक लाल चेंडूवर भारतीयांचा सराव – रोहित शर्मा

(पीटीआय) गुलाबी चेंडूवर खेळल्या गेलेल्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या...

Vivo X 200 स्मार्टफोन सीरीज उद्या लॉन्च होणार आहे…

टेक कंपनी Vivo उद्या (12 डिसेंबर) X...
HomeMaharashtraआय लव्ह मारकरवाडी…! विरोधकांचा पहिल्याच दिवशी शपथविधीवर बहिष्कार

आय लव्ह मारकरवाडी…! विरोधकांचा पहिल्याच दिवशी शपथविधीवर बहिष्कार

शपथविधी सोहळ्याच्या पहिल्याच अधिवेशनात विरोधकांनी सभात्याग केला.

महाराष्ट्र विधानसभेच्या विशेष अधिवेशनाला शनिवारपासून सुरुवात झाली. हंगामी विधानसभा अध्यक्ष कालिदास कोळंबकर यांनी राज्यातील नवनिर्वाचित आमदारांना पद आणि गोपनियतेची शपथ दिली. सत्ताधारी आमदारांनी केलेला खास पेहराव, विरोधकांचा बहिष्कार, घोषणाबाजीमुळे आजचे विशेष अधिवेशन विशेष ठरले. शपथविधी सोहळ्याच्या पहिल्याच अधिवेशनात विरोधकांनी सभात्याग केला. सत्ताधारी आमदारांचे शपथविधी सुरु असतानाच आदित्य ठाकरे, राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्यासह विरोधकांनी सभात्याग केला. ‘आय लव्ह मारकडवाडी’ असे बॅनर झळकवित विरोधी आमदारांनी इव्हिएमविरोधात विधानभवनाच्या पायऱ्यावर आंदोलन केले.

फेटे घालून एन्ट्री – महायुती सरकारच्या पहिल्याच अधिवेशनासाठी शिवसेना शिंदे गट तसेच राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या आमदारांनी केलेला पेहराव चर्चेचा विषय ठरला. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील आमदारांनी भगवे फेटे घालून तर अजित पवारांच्या आमदारांनी गुलाबी फेटे घालून विधानभवनात एन्ट्री केली.

पहिल्याच दिवशी बहिष्कार – विधानसभा अधिवेशनात विरोधक, सत्ताधाऱ्यांमध्ये कलगीतुरा अन् नाराजीनाट्य नेहमीच पाहायला मिळते. मात्र शपथविधी सोहळ्याच्या पहिल्याच अधिवेशनात विरोधकांनी सभात्याग केला. सत्ताधारी आमदारांचे शपथविधी सुरु असतानाच आदित्य ठाकरे, राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्यासह विरोधकांनी सभा त्याग केला. आजच्या विशेष अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी एकाही विरोधी आमदाराने शपथ घेतली नाही. विधानसभा निवडणुकीत ईव्हीएमचा गैरवापर झाल्याचा आरोप करत विरोधकांनी सभात्याग केला. त्याचबरोबर शपथ न घेण्याचाही निर्णय घेतला. आता उद्या विरोधी पक्षांच्या आमदारांचा शपथविधी होणार आहे.

जय श्रीरामच्या घोषणा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आपल्या आमदारकीची शपथ घेत असताना भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी मोठा जल्लोष केला. यावेळी भाजप आमदारांनी जय श्रीराम, छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजीच्या जोरदार घोषणा दिल्या. विधानसभा सदस्यत्वाची शपथ घेताना अनेक आमदारांनी मराठी भाषा टाळून इतर भाषांमध्ये आपली शपथ घेतली. भारतीय जनता पक्षाचे नेते गिरीश महाजन, नितेश राणे, राम कदम, सिमा हिरे यांनी संस्कृतमधून तसेच अबु आझमी यांनी हिंदीमधून तर यांनी उर्दु भाषेतून शपथ घेतली.

अल्लाह साक्ष शपथ – विधानसभा सदस्यत्वाची शपथ घेताना अनेक आमदारांनी आपल्या शपथविधीची सुरुवात अल्लाह साक्ष शपथ.. असे म्हणत केली. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते हसन मुश्रीफ, समाजवादी पक्षाचे अबु आझमी यांनी ईश्वर साक्ष ऐवजी अल्लाह साक्ष म्हणत आपला शपथविधी घेतला. राज्याच्या विधानसभा निवडणुकीत पहिल्यांदाच निवडणूक लढवत ७८ आमदारांनी विधानसभेत प्रवेश केला आहे. शिवसेना ठाकरे गटामधून १०, काँग्रेसचे सहा आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादीमधून ६ आमदार पहिल्यांदाच निवडून आलेले आहेत.

भगवद्गीता घेऊन शपथ – सांगली जिल्ह्याच्या मिरज विधानसभेचे आमदार सुरेश खाडे यांनी हातामध्ये भगवद्गीता घेऊन शपथ घेतली. यावेळी काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड यांनी आक्षेप नोंदवला. हे सभागृह आहे, इथे धर्म बाजूला ठेऊन सहभागी व्हायला हवे, असे म्हणत वर्षा गायकवाड यांनी जोरदार विरोध केला. त्यामुळे सुरेश खाडेयांनी घेतलेलाशपथविधीचांगलाच वादाच्या भोवऱ्यात सापडल्याचे दिसून आले. विधानसभा सदस्यत्वाची शपथ घेण्याआधी शिवसेना ठाकरे गटाचे कल्याण ग्रामीणचे आमदार राजेश मोरे हे विधानभवनाच्या पायऱ्यांवर नतमस्तक झाले. पायऱ्यांवर डोके ठेऊन त्यांनी दर्शन घेत विधानसभेत प्रवेश केला. राज्याच्या विधानसभा निवडणुकीत २५ ते ४५ वर्ष वयोगटातील फक्त ५७ आमदार आहेत. १९७० च्या विधानसभा निवडणुकीनंतर पहिल्यांदाच ही संख्या सर्वात कमी असल्याचे समोर आले आहे.

RELATED ARTICLES

Most Popular