28.7 C
Ratnagiri
Saturday, May 10, 2025

निधी अभावी काजू तारण योजना पडली बंद – कृषी उत्पन्न बाजार समिती

बदलत्या हवामानाच्या परिणामामुळे दरवर्षी काजूची उत्पादकता घटलेली...

पाईपलाईनचे काम अखेर सुरू, शीळ धरण ते जॅकवेल परिसर

शीळ धरण कालवा ते जॅकवेलपर्यंतची " सुमारे...

जिल्हाभरात दुसऱ्या दिवशीही पावसाची हजेरी, नागरिकांची तारांबळ

सलग दुसऱ्या दिवशी सकाळीच पडलेल्या पावसाने जिल्हावासीयांना...
HomeRatnagiriगृहनिर्माण प्रकल्पात ऐतिहासिक संग्रहालय कर - पालकमंत्री उदय

गृहनिर्माण प्रकल्पात ऐतिहासिक संग्रहालय कर – पालकमंत्री उदय

सुशोभीकरणासाठी १ कोटीचा निधी दिला जाईल.

पोलिस विभागाच्या प्रस्तावित १३१ कोटींच्या गृहनिर्माण प्रकल्पामध्ये पोलिस दलाचे ऐतिहासिक वाटचाल सांगणारे संग्रहालय तयार करावे, अशा सूचना पालकमंत्री उदय सामंत यांनी संबंधितांना दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत ते बोलत होते. या वेळी जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह, पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्तिकिरण पुजार, अप्पर जिल्हाधिकारी शंकर बर्गे, निवासी उपजिल्हाधिकारी चद्रकांत सूर्यवंशी, सर्वसाधारण उपजिल्हाधिकारी शुभांगी साठे, जिल्हा नियोजन अधिकारी सत्यविनायक मुळे, प्रांताधिकारी जीवन देसाई, मुख्याधिकारी तुषार बाबर व संबंधित अधिकारी आदी उपस्थित होते.

पालकमंत्री सामंत म्हणाले, थ्रीडी मॅपिंग मल्टिमीडियाचे लोकार्पण २६ जानेवारीला होईल, अशा पद्धतीने कामकाज करावे. संरक्षण भिंत रंगरंगोटी, साफसफाई, सुशोभीकरणासाठी १ कोटीचा निधी दिला जाईल. पावसामध्ये टिकणारे फर्निचर कायमस्वरूपी करावे. पर्यटनवाढीच्या दृष्टिकोनातून भव्य कामकाज झाले पाहिजे. रत्नागिरी होणाऱ्या पालिकेच्या माध्यमातून नाट्यगृहाचे लोकार्पण २६ जानेवारीला होईल, त्या दृष्टीने गतीने कामकाज करावे. ध्यानकेंद्र, बुद्धांची गोल्डन मूर्ती याबाबत विशेष लक्ष द्यावे. पोलिस अधीक्षक कार्यालयाच्या १३१ कोटींच्या नूतन प्रस्तावित इमारतीमध्ये संग्रहालयाची निर्मिती करण्यात यावी. यामध्ये पोलिस दलाचा इतिहास बदलत जाणारे त्यांचे पोशाख, ऐतिहासिक शस्त्रे यांची माहिती आणि वस्तू असाव्यात. हे संग्रहालय राज्यातील अनोखे व्हावे यासाठी प्रयत्न करावेत, अशा सूचना त्यांनी पोलिस दलाला दिल्या.

RELATED ARTICLES

Most Popular