तिसऱ्या तिमाहीत देशातील स्मार्टफोन शिपमेंटमध्ये तीन टक्क्यांनी घट झाली आहे. तथापि, दक्षिण कोरियाची ग्राहक इलेक्ट्रॉनिक्स कंपनी सॅमसंगने 79 लाख स्मार्टफोन्स आणि 18 टक्के मार्केट शेअरसह या बाजारात आपले पहिले स्थान कायम ठेवले आहे. या वर्षाच्या सुरुवातीला, कंपनीने Galaxy S23 मालिका लाँच केली आणि यामुळे सॅमसंगला त्याचा मार्केट शेअर वाढविण्यात मदत झाली आहे. या मार्केटमध्ये स्मार्टफोन निर्माता कंपनी Xiaomi दुसऱ्या स्थानावर आहे. यानंतर चिनी स्मार्टफोन कंपन्या Vivo, Realme आणि Oppo आहेत. आगामी सणासुदीच्या विक्रीमुळे आणि ग्राहकांच्या सुधारलेल्या भावनांमुळे स्मार्टफोनच्या बाजारपेठेतील विक्री वाढण्याची अपेक्षा आहे.
बाजार विश्लेषण फर्म कॅनालिसने एका अहवालात म्हटले आहे की तिसऱ्या तिमाहीत देशात 4.3 कोटी स्मार्टफोन पाठवण्यात आले. वर्ष-दर-वर्ष आधारावर ही तीन टक्क्यांची घसरण आहे. या मार्केटमध्ये सॅमसंगचा मोठा वाटा आहे. जुलै-सप्टेंबर या कालावधीत 79 लाख स्मार्टफोनच्या शिपमेंटसह कंपनीने आपले पहिले स्थान कायम ठेवले आहे. चीनच्या Xiaomi ने जवळपास 18 टक्के मार्केट शेअरसह दुसरे स्थान मिळवले आहे. परवडणारे 5G स्मार्टफोन लॉन्च केल्याने कंपनीला फायदा झाला आहे.
तिसऱ्या तिमाहीत 72 लाख स्मार्टफोनच्या शिपमेंटसह Vivo तिसऱ्या स्थानावर आहे. यानंतर Realme आणि Oppo चौथ्या आणि पाचव्या स्थानावर होते. कॅनालिस म्हणाले की, स्मार्टफोन निर्मात्यांनी परवडणाऱ्या 5G स्मार्टफोनवर लक्ष केंद्रित करून सणासुदीच्या काळात त्यांच्या उत्पादनांची जाहिरात केली आहे. यामध्ये Redmi 12 5G आणि Poco M6 Pro 5G सारख्या स्मार्टफोनचा समावेश आहे. Realme ला Realme 11x 5G आणि 11 5G सह विक्री वाढवणे सोपे झाले आहे. Motorola, Infinix आणि Tecno ने देखील कमी किमतीचे स्मार्टफोन लॉन्च केले आहेत.
तिसर्या तिमाहीत प्रीमियम स्मार्टफोन सेगमेंटमध्ये जोरदार वाढ झाली. अमेरिकन उपकरण निर्माता Apple च्या iPhone 13 आणि iPhone 14 तसेच Samsung च्या Galaxy S23 मालिकेची विक्री झपाट्याने वाढली आहे. ग्राहकांच्या भावना सुधारून आणि नवीन स्मार्टफोन्स लाँच केल्याने बाजार सावरेल असा विश्वास कॅनालिसला आहे. मात्र, जागतिक अर्थव्यवस्थेमुळे आव्हान वाढू शकते. स्मार्टफोन कंपन्यांनी बाजारातील हिस्सा टिकवून ठेवण्यासाठी त्यांच्या उत्पादनांच्या पोर्टफोलिओमध्ये सुधारणा करणे आवश्यक आहे.