25.4 C
Ratnagiri
Monday, September 1, 2025

कोत्रेवाडीतील कचरा प्रकल्पाला विरोध कायम, उपोषणकर्त्यांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

कोत्रेवाडी येथील प्रस्तावित डंपिंग ग्राऊंड हटावसाठी ग्रामस्थांनी...

आरवली-संगमेश्वर ते बावनदी येथील खड्डे जैसे थे

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी आरवली-संगमेश्वर ते बावनदी...

मुंबई-गोवा महामार्गासाठी ना. योगेश कदम यांचे गणपतीबाप्पाला साकडे

पुढच्या वर्षी महामार्ग पूर्ण होईल असे दरवर्षी...
HomeRatnagiriवातावरणात अनाकलनीय बदल खाड्यांचे पाणी अचानक वाढले

वातावरणात अनाकलनीय बदल खाड्यांचे पाणी अचानक वाढले

शुक्रवारी नेहमीपेक्षा पाण्याची पातळी अधिकच वाढली होती.

गेले २ दिवस वातावरणात अनाकलनीय बदल झाल्याचे पाहायला मिळत आहे. एकीकडे सूर्य आग ओकत असल्याने तापमान वाढत असतानाच शुक्रवारी सायंकाळनंतर रत्नागिरी नजीकच्या खाड्यांमधील पाण्याच्या पातळीत अनाकलनीयरित्या वाढ झाल्याचे दिसून आले. अमावास्येच्या उधाणामुळे हे पाणी वाढले असे मानले तरी नेहमीच्या तुलनेत अधिक पाणी वाढल्याने यामागे नेमके कारण काय याची चर्चा सुरू झाली आहे. याचा संदर्भ भूकंपाशी तर नाही ना अशी शंका उपस्थित होत आहे. शुक्रवारी म्यानमार आणि बँकॉकमध्ये प्रचंड शक्तीशाली असे भूकंप झाले असून त्यात शेकडो लोकं प्राणाला मुकली आहेत. अक्षरशः हाहाकार माजला आहे. शुक्रवारी भारताची राजधानी नवी दिल्लीमध्ये देखील भूकंपाचे धक्के जाणवले. मात्र सुदैवाने म्यानमार आणि बँकॉकप्रमाणे भारतात हानी झाली नाही.

या पार्श्वभूमीवर खाडीच्या पाण्यात झालेल्या वाढीची चर्चा सुरू आहे. भूकंपानंतर अनेकवेळा त्सुनामी लाटा उसळतात. त्यामुळे नवी दिल्लीत झालेल्या भूकंपाचा परिणाम म्हणून शुक्रवारी सायंकाळी खाडीच्या पाण्यात अनाकलनीय अशी वाढ झाली की काय अशी शंका उपस्थित होत आहे. अर्थात शुक्रवारी अमावास्या होती. प्रत्येक अमावास्येला उधाणाची भरती येत असते. मात्र शुक्रवारी नेहमीपेक्षा पाण्याची पातळी अधिकच वाढली होती असे खाडीकिनारी राहणारे लोकं सांगतात. गेले काही दिवस समुद्रातील वातावरण फारसे चांगले नसल्याचे बोलले जात आहे. त्याचा परिणाम मासेमारीवर देखील होतो आहे.  या पार्श्वभूमीवर शुक्रवारी झालेला भूकंप आणि त्या पार्श्वभूमीवर खाडीच्या पाण्यात झालेली वाढ याचा संदर्भ जोडला जात आहे.

दरम्यान उष्णताही वाढते आहे. शुक्रवारपासून संपूर्ण रत्नागिरी जिल्हयात सूर्य आग ओकू लागल्याने उष्म्याचे प्रमाण वाढले आहे. एकूणच वातावरणातील या अनाकलनीय अशा बदलाने सारेच चकित झाले आहेत. जपानमध्ये त्सुनाम ीची लाट आली त्यावेळी श्रीलंका आणि भारतालाही धक्का बसला होता. म्यानमारममध्ये झालेल्या भूकंपाच्यानंतरही समुद्राच्या पाण्यामध्ये वाढ झाली आहे. या भूकंपानंतर समुद्राच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे. याचाच परिणाम समुद्र किनारपट्टीवर होत आहे का अशी चर्चा सुरू आहे.

RELATED ARTICLES

Most Popular