25.6 C
Ratnagiri
Thursday, September 19, 2024

Redmi Note 14 मालिका 50MP OIS कॅमेऱ्यासह लॉन्च केला जाईल…

कंपनीने अधिकृतपणे Redmi Note 14 सीरीजचा खुलासा...

आता कसोटी क्रिकेटचे नगारे, डिसेंबरपर्यंत दहा सामने

सातत्यपूर्ण व्हाइटबॉल क्रिकेट खेळल्यानंतर उद्यापासून भारताच्या कसोटी...

नेटवर्कअभावी लाडक्या बहिणी त्रस्त, ग्रामीण भागातील स्थिती

पुरवठा विभागाने घरगुती गॅस सिलिंडरसाठी मोबाईलवरील येणारा...
HomeRatnagiri२१ मोकाट कुत्र्यांना विष घालून मारल्याचा संशयावरून एकाला अटक

२१ मोकाट कुत्र्यांना विष घालून मारल्याचा संशयावरून एकाला अटक

काल रत्नागिरी शहरातील २१ कुत्र्यांना अन्नात विष घालून मारल्याचा संशयावरून अटक केलेल्या रत्नागिरी नगर परिषदेच्या निवृत्त कर्मचाऱ्याला शहर पोलिसांनी सिद्धार्थ गोविंद कदम याला गुरुवारी रात्री उशिरा अटक केली.

रत्नागिरी शहरातील मारुती मंदिर परिसर त्याचप्रमाणे, लगतच्या परिसरामध्ये आठवड्याभरापूर्वी अचानक २१ उनाड कुत्र्यांच्या झालेल्या मृत्यूने एकच खळबळ उडाली. याबाबत अनेक प्राणीमित्र आणि संबधित संघटना संतप्त झाल्या असून, संबंधितांवर योग्य ती कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे.

प्राणीमित्र सनिल उदय डोंगरे यांनी या गंभीर प्रकरणाबाबत पोलीस स्थानकात रीतसर तक्रार दिली आहे. तक्रारीत म्हटल्याप्रमाणे सनिल डोंगरे याला रात्री १२ च्या सुमारास रस्त्यावर अनेक कुत्रे मृतावस्थेत आढळल्याची माहिती मिळाली. याप्रकरणी त्यांनी स्थानिक नागरिकांन सोबत घेऊन अधिक शोध घेतला असता, रस्त्यावर एकूण २१ कुत्रे मृत आढळले. या कुत्र्यांना चिकन, भात खायला ठेवलेला दिसून आला. याबाबत सनिल डोंगरे यांने रत्नागिरी शहर पोलीस स्थानकात माहिती दिली.

कुणीतरी अज्ञात इसमाने कुत्र्यांना जीवे मारण्याच्या उद्देशाने चिकन व भातामध्ये कोणतेतरी विषारी औषध कालवून ते कुत्र्यांना खाण्यास दिले व त्यामुळे त्वरित २१ कुत्रे मयत झाल्याचे डोंगरे यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे. पोलिसांनी या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन त्या अनुजोगे तपासाला सुरुवात केली आहे. या कुत्र्यांचे आता शवविच्छेदन केल्यानंतरच याबाबत अधिक खुलासा होणार आहे.

काल रत्नागिरी शहरातील २१ कुत्र्यांना अन्नात विष घालून मारल्याचा संशयावरून अटक केलेल्या रत्नागिरी नगर परिषदेच्या निवृत्त कर्मचाऱ्याला शहर पोलिसांनी सिद्धार्थ गोविंद कदम याला गुरुवारी रात्री उशिरा अटक केली. त्याला न्यायालयात हजर केले असता त्याला जामीन मंजूर झाला आहे. शहरातील तब्बल २१ कुत्रे एकाच दिवशी रस्त्यावर मारून पडल्याने एकच खळबळ उडाली होती. सोशल मिडीयावर देखील या करण्यात आलेल्या नीच प्रकाराबद्दल एक प्रकारचे निषेध दर्शविणारे आंदोलन सुरु आहे.

RELATED ARTICLES

Most Popular