शनिवार दिनांक ३१-०७-२०२१ रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील ग्रामीण भागामध्ये १८ वर्षावरील लाभार्थ्यांना कोविशिल्ड लसीची दुसरी मात्रा प्राधान्याने देण्यात येणार आहे. तद्नंतर नवीन लाभार्थ्यांना लस देण्यात येईल, तरी उपलब्ध डोस व पात्र लाभार्थी याप्रमाणे संबंधित प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी यांनी लसीकरणाचे ठिकाण तारीख व वेळ याबाबतचे योग्य नियोजन करून त्याबाबतची माहिती नागरिकांना देऊन लसीकरण सत्र सुरळीतपणे पार पाडावे अशी प्रेस नोट शासनाने जाहीर केली आहे

वर नमूद केलेले डोस लसीकरण केंद्राचे ठिकाणी ऑन स्पोर्ट पद्धतीने देण्यात येणार आहे तरी कृपया सर्व नागरिकांनी याची नोंद घेऊन लसीकरण सत्र सुरळीत होण्यास सहकार्य करावे लसीकरण संदर्भात काही शंका असल्यास किंवा काही ती माहिती हवी असल्यास पुढील नंबर वर सकाळी १० ते सायंकाळी ५:४५ या वेळेत संपर्क करावा (फोन क्रमांक 02352-221403)

