29.7 C
Ratnagiri
Friday, December 13, 2024

वंचित आघाडीच्या मोर्चाने अवघे चिपळूण दणाणले

शिवसेना नेते आणि गुहागरचे आमदार भास्कर जाधव...

जयगडमध्ये गॅस प्रकल्पातून वायुगळती, ६१ विद्यार्थी गुदमरले!

या वायुगळतीमुळे शाळकरी विद्यार्थ्यांना मोठा त्रास झाला....

हे 1.5 टन स्प्लिट एसी हिवाळ्यात खोली लवकर गरम करतात…

हिवाळा ऋतू आला आहे. हळुहळू थंडीने रौद्ररूप...
HomeRatnagiriविरोधकांचे काम केवळ टीका आणि संभ्रम निर्माण करणे – उद्योगमंत्री सामंत

विरोधकांचे काम केवळ टीका आणि संभ्रम निर्माण करणे – उद्योगमंत्री सामंत

पुढच्या वर्षी या दोन प्रकल्पापेक्षाही मोठे प्रोजेक्ट महाराष्ट्रात आणले जातील, याची ग्वाही उद्योगमंत्री म्हणून आपण देतो, असे सामंत यांनी म्हटले आहे.

वेदांता ग्रुपचा फॉस्कफॉन प्रकल्प यापूर्वीच गुजरातला गेल्यावर आता या प्रकल्पानंतर २२००० कोटी रुपयांचा टाटा एअर बसचा मोठा प्रकल्प देखील गुजरात बडोदा येथे गेल्याची माहिती अचानक धडकली आहे. त्यामुळे आता अजून एक मोठा व्यवसायभिमुख प्रकल्प महाराष्ट्रा बाहेर पडल्याने रोजगाराची मोठी कमतरता भासणार आहे. यावरून विरोधकांनी उद्योगमंत्री उदय सामंत यांच्यावर चांगलाच निशाणा साधला आहे. त्यावर उद्योगमंत्री उदय सामंत यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे.

हा प्रकल्प गेल्या वर्षीच तिकडे गेला असल्याचे त्यांनी सांगितले. विरोधक केवळ टिका करणे व लोकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचे काम करण्यापलीकडे काहीच करत नाहीत असा आरोप सामंत यांनी केला. टाटा-एअरबस प्रकल्पाविषयी केंद्र सरकार व संबंधित यंत्रणा यांच्यात वर्षभरापूर्वीच सामंजस्य करार झाला आहे. पण महाविकास आघाडी सरकारने हा प्रकल्प राज्यात राहावा यासाठी कोणतेच प्रयत्न केले नाहीत. उद्योग मंत्रालयाकडून यासाठी कोणताही पाठपुरावा करण्यात आलेला नाही.

२१ सप्टेंबर २०२१ रोजीच या प्रकल्पासाठीचा सामंजस्य करार झाला होता. पण सत्तेत झालेल्या बदलामुळे,  आता हेच विरोधक जाणीवपूर्वक संभ्रम निर्माण करत आहेत, असा पलटवार सामंत यांनी केला आहे. ज्यांनी सत्तेत असतानाही काही केले नाही, ते केवळ आता युवा पिढीमध्ये संभ्रम निर्माण करण्याचे अर्थहीन काम करत आहेत. वेदांता किंवा हाही प्रकल्प आमच्या सरकाच्या आधीच तिकडे गेल्याचे पुरावेही आमच्या विभागाकडे आहेत. आम्ही युवा पिढीला, बेरोजगारांना कुठेही वाऱ्यावर सोडणार नाही. तरुणाईला रोजगार मिळवून देणे हा आमचा प्राधान्यक्रम राहील. मुख्यमंत्री व आम्ही सांगितले आहे की, पुढच्या वर्षी या दोन प्रकल्पापेक्षाही मोठे प्रोजेक्ट महाराष्ट्रात आणले जातील, याची ग्वाही उद्योगमंत्री म्हणून आपण देतो, असे सामंत यांनी म्हटले आहे.

वेदांता-फॉक्सकॉन पाठोपाठ महाराष्ट्रात प्रस्तावित असलेला टाटा समूहाचा एअरबस प्रकल्प गुजरातला गेल्यामुळे राजकीय वादाला तोंड फुटले आहे. ठाकरे गटाकडून यासाठी शिंदे-फडणवीस सरकारला जबाबदार धरण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर उद्योगमंत्री उदय सामंत यांनी सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.

RELATED ARTICLES

Most Popular