राज्यातील दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्वाची बातमी समोर आली आहे. दहावी-बारावीचे निकाल यावर्षी वेळेमध्ये लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. बारावीचा निकाल हा पुढच्या आठवड्यात ६ किंवा ७ जूनला लागण्याची शक्यता आहे. तर दहावीचा निकाल हा जूनच्या शेवटच्या आठवड्यामध्ये लागेल. राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी याबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे.
याबाबत पुढे सांगताना त्या म्हणाल्या कि, “दहावी आणि बारावीचे निकाल वेळेत लावण्याचा प्रयत्न आहे. पुढच्या आठवड्यात १२ वीचा निकाल लागेल. दहावीचा निकाल हा जूनच्या दुसऱ्या आठवड्याच्या सुरुवातीला लागू शकेल. हा निकाल ६ किंवा ७ जूनला लागू शकेल. तर जूनच्या शेवटच्या आठवड्यात दहावीचा निकाल लागणार”, अशी माहिती वर्षा गायकवाड यांनी दिली आहे.
दरम्यान, कोरोनामुळे गेल्या दोन वर्षांपासून सर्व शाळा आणि कॉलेजेस बंद होते. त्यामुळे विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीनं शिक्षण देण्यात येत होतं. गेल्या वर्षी बोर्डाच्या परीक्षाही रद्द करण्यात आल्या होत्या. त्यानंतर बोर्डाच्या विद्यार्थ्यांचा निकाल विशेष मूल्यांकन पद्धतीनं लावण्यात आला होता. यंदा बोर्डाच्या परीक्षा ऑफलाईन पद्धतीनं घेण्यात आल्या आहेत. त्यामुळे बोर्डाच्या परीक्षांचा निकाल नेहमीपेक्षा उशिरा जाहीर होण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. मात्र पेपर तपासणी पूर्ण झाली असून मूल्यांकन प्रक्रिया सुरु आहे. त्यामुळे लवकरच बारावीचे निकाल जाहीर होणार असल्याची माहिती समोर येत आहे.
विद्यार्थ्यांनी निकाल पाहण्यासाठी अधिकृत दिलेल्या खाली दिलेल्या वेबसाईट्सवर भेट द्यावी.
- https://hscresult.11thadmission.org.in
- https://msbshse.co.in
- hscresult.mkcl.org
- mahresult.nic.in