22.7 C
Ratnagiri
Friday, November 22, 2024

OPPO Find X8, Find X8 Pro डायमेंसिटी 9400 प्रोसेसर, AMOLED डिस्प्लेसह लॉन्च…

OPPO ने अलीकडेच आपले फ्लॅगशिप स्मार्टफोन OPPO...

‘पुष्पा 2: द रुल’, अल्लू अर्जुनची जादू पुन्हा चालेल…

2021 च्या ब्लॉकबस्टर चित्रपट 'पुष्पा: द राइज'चे...
HomeRatnagiriअपघाती मृत्यू झाल्यास १० लाखांची मदत, आशा सेविका, गटप्रवर्तकांना दिलासा

अपघाती मृत्यू झाल्यास १० लाखांची मदत, आशा सेविका, गटप्रवर्तकांना दिलासा

ग्रामीण व शहरी भागात १ हजार २०० आशा स्वयंसेविका कार्यरत आहेत

आरोग्यविषयी जनजागृती, प्रोत्साहन देणे, माता व बालआरोग्य या विविध कामांच्या जबाबदाऱ्या यशस्वीरीत्या पार पाडणाऱ्या आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांना राज्य शासनाने मोठा दिलासा दिला आहे. सेवा बजावताना अपघाती मृत्यू आल्यास १० लाख, कायमस्वरूपी अपंगत्व आल्यास ५ लाखांची मदत शासनाने जाहीर केली आहेत. आरोग्ययंत्रणा, सेवाभावी संस्था व ग्रामस्थ, समाजातील अन्य घटक यामध्ये आरोग्यासंदर्भात जागरुकता, सुसंवाद, समन्वय, प्रोत्साहन निर्माण करण्याच्यादृष्टीने आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक महत्त्वपूर्ण सामाजिक दुवा म्हणून कार्यरत आहेत.

आशा स्वयंसेविकांचा माता आरोग्य, बालआरोग्य, कुटुंब नियोजन इत्यादी कारणांसाठी नियमित गृहभेटी देणे, माता व बालकांना मार्गदर्शन करणे, रुग्णांना प्राथमिक आरोग्यकेंद्र, ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, जिल्हा रुग्णालय येथे उपचारासाठी दाखल करणे अशा प्रकारची कर्तव्ये आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांना बजवावी लागतात. आशा स्वयंसेविका गटप्रवर्तक यांच्या कामाचे स्वरूप विचारात घेऊन आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांचा कर्तव्य बजावत असताना अपघाती मृत्यू झाल्यास १० लाख रुपये व कायमस्वरूपी अंपगत्व आल्यास ५ लाख रुपये सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. १ एप्रिलपासून हा निर्णय लागू होणार आहे. त्यामुळे आशा स्वयंसेविका, गटप्रवर्तकांना दिलासा मिळाला.

१ हजार २०० आशासेविका कार्यरत – रत्नागिरी जिल्ह्याच्या ग्रामीण व शहरी भागात १ हजार २०० आशा स्वयंसेविका कार्यरत आहेत, तर १०० गटप्रवर्तक कार्यरत असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागामार्फत देण्यात आली. शासनाने जाहीर केलेल्या योजनांचा लाभ आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांना होणार आहे.

RELATED ARTICLES

Most Popular