25.3 C
Ratnagiri
Sunday, August 3, 2025

मुहूर्ताच्या दिवशी पावसाचा खोडा केवळ २० टक्के नौका समुद्रात

शुक्रवारपासून मासेमारीवरील बंदी उठल्यानंतर पहिल्याच दिवशी स्थानिक...

“आम तो आम और गुटली का भी दाम” असा हा प्रकल्प : अनिकेत सुर्वे

"आता वाटद दशक्रोशीतील युवकांनी निर्धार केला आहे,...

स्मार्ट वीजमीटरचा निर्णय रद्द करायला लावू – लियाकत शाह

स्मार्ट वीजमीटर बसवल्यानंतर वाढीव वीजबिले येत असल्याच्या...
HomeRatnagiriकोकण बोर्ड अव्वल, १०० टक्के निकाल

कोकण बोर्ड अव्वल, १०० टक्के निकाल

काल राज्याचा महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे २०२१ मध्ये शालेय अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे तयार करण्यात आलेला दहावीचा निकाल जाहीर करण्यात आला. परंतु, दुपारी एक वाजल्यापासून साईटच्या अडचणीमुळे विद्यार्थ्यांना निकाल पाहण्यास अडचणी निर्माण होत होत्या. त्यानंतर १० वी बोर्डाची वेबसाइट हॅक झाली असल्याच्या बातम्या व्हायरल झाल्या होत्या, याबाबत तपास करण्यासाठी राज्य सरकारने चौकशी समिती नेमली असून, समिती आपला अहवाल १५ दिवसात सादर करणार आहे. वेबसाईट हॅक झाल्याचा संशय शिक्षण विभागाकडून व्यक्त केला जात आहे. त्यामुळे शालेय शिक्षणमंत्री यांनी दिलगिरी व्यक्त करत, दोषी व्यक्तींवर कठोर कारवाई करणार असल्याचा इशारा दिला आहे. शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन ट्विट करत ही माहिती दिली आहे.

संध्याकाळी उशिरा अगदी धिम्या गतीने वेबसाईट काम करायला लागली होती. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे दहावीची लेखी परीक्षा रद्द करण्यात आलेली, त्यामुळे विद्यार्थ्यांचे मुल्यांकन अंतर्गत गुणांच्या आधारे करण्यात आले. याही वर्षी कोकण बोर्ड अव्वल स्थानी असून, राज्याचा निकाल ९९.९५ % लागला असून, कोकण बोर्डाचा निकाल १००% लागला आहे. सलग कोकण बोर्डाचा निकाल अव्वल लागत असून, याही वर्षी मुलींनी बाजी मारली आहे. त्याचप्रमाणे, दहावीच्या अभ्यासक्रमातील सत्तावीस विषयांचा निकाल १०० टक्के लागला आहे.

अँड. विलास पाटणे यांनी विशेष शुभेच्छा दिल्या आहेत. कोकण बोर्डाचे सातत्याने शिखरावर राहणे कौतुकास्पद अभिनंदनीय. शिक्षक, पालक व विद्यार्थी यांच्या सामूहिक प्रयत्नाचे हे यश आहे .तज्ञांचे मार्गदर्शन, योग्य सराव ,नियोजन व परस्पर संवाद यामुळे कोकण पॅटर्न स्थिरावला आहे. कोकण बोर्ड आंदोलनात चार पाऊले टाकण्याचा आनंद व अभिमान असून, कोकणातील विद्यार्थ्यानी  स्पर्धा परिक्षेकडे गांभिर्याने पहावे. ‘स्वप्न पहा, स्वप्न जगा’ अभिनंदन.

RELATED ARTICLES

Most Popular