29.2 C
Ratnagiri
Sunday, July 13, 2025

सावर्डेत मत्स्यपालन, कुक्कूटपालन, कृषी पर्यटनाची शेतीला जोड

वडिलोपार्जित पारंपरिक शेतीला बाजारातील मागणीचा लाभ घेऊन...

चिपळुणात सदोष स्मार्ट मीटर बसवू नका…

स्थानिकांचा विरोध असतानाही अदानी पॉवर कंपनीने जुने...

चिपळूण घरकुलाचे स्वप्न जमीनदोस्त, तहसीलदारांकडे तक्रार

तालुक्यातील कादवड-सुतारवाडी येथील शासकीय योजनेतून मंजूर झालेल्या...
HomeRatnagiriबारावी परीक्षा ३८ केंद्रांवर सुरूपुष्प देऊन प्रोत्साहन...

बारावी परीक्षा ३८ केंद्रांवर सुरूपुष्प देऊन प्रोत्साहन…

गैरप्रकार रोखण्यासाठी परीक्षाकेंद्रांवर चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

बारावीच्या लेखी परीक्षेला आज शांततेत सुरुवात झाली. ही परीक्षा १८ मार्चपर्यंत चालू राहणार आहे. कोकण परीक्षा मंडळातून रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्ह्यातून २४ हजार ५४१ विद्यार्थी परीक्षेला बसले आहेत. बारावीच्या परीक्षेसाठी रत्नागिरी जिल्ह्यात ३८ व सिंधुदुर्गमध्ये २३ अशी एकूण ६१ परीक्षा केंद्रे नियुक्त केली आहेत. यामध्ये कनिष्ठ महाविद्यालयांची संख्या १६३, सिंधुदुर्गमधील ८९ आहे. रत्नागिरी जिल्ह्यातून १६ हजार ५४ व सिंधुदुर्गमधून ८ हजार ४८७ विद्यार्थी परीक्षेला बसले आहेत. आज सकाळी सर्वच परीक्षा केंद्रांवर विद्यार्थ्यांचे लेखी परीक्षेसाठी उत्साहात व आनंदी वातावरणात स्वागत करण्यात आले. फाटक हायस्कूल येथील केंद्रावर मुख्याध्यापक राजन कीर व सर्व शिक्षकांनी विद्यार्थ्यांना पुष्प देऊन परीक्षेसाठी प्रोत्साहन दिले. मुलगे व मुलींना स्वतंत्र रांगेत शिस्तीत वर्गात पाठवले. गैरप्रकार रोखण्यासाठी परीक्षाकेंद्रांवर चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. तसेच परीक्षा शांततेत व सुरळीत होण्याकरिता आणि कॉपी अथवा गैरप्रकार होऊ नये यासाठी केंद्रप्रमुखांना सूचना देण्यात आल्या आहेत. परीक्षेच्या कालावधीत १०० मीटर परिसरात एसटीडी बूथ, झेरॉक्स टायपिंग सेंटर, ध्वनीक्षेपण आदी माध्यमे बंद ठेवली.

पालकमंत्री उदय सामंत यांनी परीक्षा काळात कॉपीमुक्त परीक्षा सुनिश्चित करण्यासाठी जिल्ह्यातील सर्व परीक्षाकेंद्रे भयमुक्त व कॉपीमुक्त राहतील यासाठी जिल्हा प्रशासन कटिबद्ध असल्याचे म्हटले आहे तसेच राज्यामध्ये कॉपी प्रकरणास पूर्णतः प्रतिबंध करण्यासाठी व विद्यार्थ्यांना कॉपीमुक्त प्रक्रियेसाठी प्रशासनाद्वारे उपाययोजना केल्याचे त्यांनी सांगितले.

आत्मविश्वासाने परीक्षेला सामोरे जा: सामंत – उज्ज्वल भविष्यासाठी शिक्षण सर्वात मोठा आधारस्तंभ आहे. परीक्षांच्या काळात तुम्ही निर्धास्त, आत्मविश्वासाने आणि प्रामाणिकपणाने परीक्षेस सामोरे जावे, यासाठी जिल्हा प्रशासन आपल्यासोबत आहे. भयमुक्त, कॉपीमुक्त परीक्षा या संकल्पनेला बळ देण्यासाठी आपण सर्वांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी दहावी व बारावीच्या परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना केले आहे.

RELATED ARTICLES

Most Popular