29.8 C
Ratnagiri
Friday, November 22, 2024

OPPO Find X8, Find X8 Pro डायमेंसिटी 9400 प्रोसेसर, AMOLED डिस्प्लेसह लॉन्च…

OPPO ने अलीकडेच आपले फ्लॅगशिप स्मार्टफोन OPPO...

‘पुष्पा 2: द रुल’, अल्लू अर्जुनची जादू पुन्हा चालेल…

2021 च्या ब्लॉकबस्टर चित्रपट 'पुष्पा: द राइज'चे...
HomeRatnagiriजिल्ह्यातील १३०० आशा सेविका एक दिवसाच्या संपावर

जिल्ह्यातील १३०० आशा सेविका एक दिवसाच्या संपावर

जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुध्द आठल्ये यांना आशा सेविका , गटप्रवर्तक व आरोग्य कर्मचारी संघटनेतर्फे निवेदन देण्यात आले.

कोरोना काळामध्ये अभूतपूर्व काम करणाऱ्या आशा सेविकाचे कार्य सर्वज्ञात आहे. त्यामुळे घरोघरी फिरून त्यांनी केलेली नोंद आणि दिलेली लसीकरणाची माहिती नक्कीच उपयुक्त ठरली. परंतु, अत्यंत अल्प मानधनामध्ये सुद्धा इतर वेळेप्रमाणे, कोरोना काळामध्ये सुद्धा स्वत:च्या जीवाची पर्वा न करता, एवढ जोखमीच काम त्यांनी पार पाडले.

शासकीय योजनेत काम करणाऱ्या सर्व कामगार आणि कर्मचाऱ्यांना दरमहा एकवीस हजार रुपये किमान वेतन द्या,  त्या आधी प्रोत्साहन भत्ता सुरु करा तरच कोविड काळात काम करु, या मागणीसाठी आशा गटप्रवर्तक आरोग्य कर्मचारी कामगार संघटनेतर्फे रत्नागिरी जिल्ह्यातील १३०० आशा सेविकांनी एक दिवसाचा संप पुकारला आहे.

रत्नागिरी जिल्हा परिषदेसमोर आंदोलन करुन जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना निवेदन दिले. जिल्हा परिषदेसमोर आयटकच्या प्रतिनिधी महिला आंदोलनासाठी उपस्थित होत्या. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुध्द आठल्ये यांना आशा सेविका , गटप्रवर्तक व आरोग्य कर्मचारी संघटनेतर्फे निवेदन देण्यात आले. यावेळी कॉ.शंकर पुजारी, संजीवनी आचरेकर, भारती जाधव, रचना येरपल्ले, रिया धोत्रे, विद्या भालेकर, पल्लवी पारकर, रश्मी कदम, प्राची लाड, सेजल नागले इत्यादी उपस्थित होत्या.

गटप्रवर्तक महीलांचे मागील पाच महिन्याचे तेरा हजार रुपये मानधन आणि इतर कामावर आधारित मोबदला आठ दिवसांमध्ये द्या,  अठरा हजार चारशे रुपये थकित मानधन आणि इतर रक्कम त्वरीत मिळावी,  आरोग्य वर्धनी योजनेची रक्कम थकीत यासह विविध मागण्यांचा निवेदनात समावेश होता. संपातील आशा व गटप्रवर्तक यांच्या बहुसंख्य मागण्या राज्य शासनाशी संबंधित आहेत, त्या शासनाकडे पाठवण्यात येतील, असे डॉ. आठल्ये यांनी यावेळी आश्वासन दिले.

RELATED ARTICLES

Most Popular